The Kapil Sharma Show : “या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाही...”, कपिल शर्मावर संतापला अक्षय कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 12:50 PM2022-09-04T12:50:38+5:302022-09-04T12:52:38+5:30

The Kapil Sharma Show : ‘कठपुतली’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय ‘कपिल शर्मा शो’मध्ये आला. पण हे काय? अक्षयने आपल्या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांचं खापर कपिल शर्माच्या डोक्यावर फोडलं...

the Kapil Sharma Show First Episode Promo Akshay Kumar Irked With Kapil Sharma Says Ye Aadmi Itni Nazar Lagata Hai | The Kapil Sharma Show : “या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाही...”, कपिल शर्मावर संतापला अक्षय कुमार 

The Kapil Sharma Show : “या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाही...”, कपिल शर्मावर संतापला अक्षय कुमार 

googlenewsNext

‘कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show ) लवकरच टीव्हीवर वापसी करतोय. नव्या सीझनचं शूटींग कधीच सुरू झालं आहे. काही सेलिब्रिटींसोबतचे काही एपिसोड शूट झालं आहे. ‘कपिल शर्मा शो’च्या या नव्या सीझनचा पहिला गेस्ट कोण असणार? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. तर त्याचं नाव आहे अक्षय कुमार (Akshay Kumar). होय, ‘कपिल शर्मा शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार गेस्ट बनून येणार आहे. ‘कठपुतली’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय ‘कपिल शर्मा शो’मध्ये आला. पण हे काय? अक्षयने आपल्या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांचं खापर कपिल शर्माच्या डोक्यावर फोडलं आहे. होय, ऐकलं ते खरं आहे. 

 अक्षय व कपिलने नुकतंच शूटींग केलं.   पहिल्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे, प्रोमोमध्ये कपिल शर्मा अक्षय कुमार आणि रकुलप्रीत सिंगचे स्टेजवर स्वागत करत आहे. ‘पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे होता? ,’ असं कपिल अक्षयला म्हणतो. पण कपिलचं हे वाक्य ऐकून अक्षय चिडतो आणि म्हणतो, ‘हा माणूस दृष्ट लावतो, सगळ्या गोष्टींना. माझे पैसे, माझे चित्रपट सर्वांना याची दृष्ट लागली. आता कोणताच चित्रपट चालत नाही....’  अक्षयचं हे बोलणं ऐकताच कपिल शर्मा आणि प्रेक्षक हसायला लागतात. अर्थात हा सगळा गमतीचा भाग. पण अक्षयचे सिनेमे  लागोपाठ फ्लॉप होत आहेत. ‘बच्चन पांडे’ आपटला. पाठोपाठ आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ही दणकून आपटला आणि यानंतरचा ‘रक्षाबंधन’ हा त्याचा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. आता अक्षयला कुणाची नजर लागली माहित नाही. पण फ्लॉप सिनेमांची चिंता त्यालाही सतावू लागली आहे, हे मात्र नक्की.


 
‘कपिल शर्मा शो’येत्या 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि भारती सिंग या शोमध्ये दिसणार नाहीत. कृष्णा आणि सुदेश लाहिरी काही कारणांमुळे शोमधून बाहेर पडले आहेत. तर भारती दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ‘कपिल शर्मा शो’मध्ये यावेळी काही नवे चेहरे दिसणार आहेत. यात सृष्टी रोडे, गौरव दुबे आणि सिद्धार्थ सागर यांचा समावेश आहे.

  

Web Title: the Kapil Sharma Show First Episode Promo Akshay Kumar Irked With Kapil Sharma Says Ye Aadmi Itni Nazar Lagata Hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.