‘थपकी प्यार की’च्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, जया भट्टाचार्य झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 10:16 AM2020-06-18T10:16:04+5:302020-06-18T10:18:10+5:30

टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी

thapki pyar ki actor irfan died due to coronavirus | ‘थपकी प्यार की’च्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, जया भट्टाचार्य झाल्या भावुक

‘थपकी प्यार की’च्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, जया भट्टाचार्य झाल्या भावुक

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दिया और बाती हमची अभिनेत्रीची आई सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्री सावलेली नसताना टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक दु:खद बातमी येऊन धडकली. ‘थपकी प्यार की’ या हिंदी मालिकेतील कॅरेक्टर आर्टिस्ट इरफानचे निधन झाले. इरफान गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. शिवाय त्याला कोरोनानेही ग्रासले होते.
‘थपकी प्यार की’च्या अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी याबद्दलची माहिती दिली. जया यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर इरफानला श्रद्धांजली वाहिली़ सोबत दोन फोटोही शेअर केलेत.

‘या टेडी बेअरच्या आत जो मुलगा आहे, तो आमचा इरफान. आता या जगात नाही. इरफान दीर्घकाळापासून आजारी होता. मी इरफानला वेळोवेळी त्याचे रिपोर्ट मागितले, जेणेकरून त्याला काय समस्या आहे, हे जाणून घेऊ शकेल. गेल्या 2 वर्षांपासून तो आरोग्यविषयक समस्यांशी लढत होता. अचानक इरफान रूग्णालयात असल्याचे गुलाब दादांनी मला सांगितले. अशक्त झाल्याने त्याला कोरोनाने ग्रासले होते. आता तो या जगातून कायमचा निघून गेला. एक मेहनती आणि प्रेमळ व्यक्ती मी गमावला. योग्यवेळी डॉक्टरांकडे गेल्यास व योग्य उपचार मिळाल्यास कदाचित आपण जीव वाचवू शकतो. खूप वाईट वाटतेय,’ असे जया यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दिया और बाती हमची अभिनेत्रीची आई सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग ही सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. तिला ऋषिकेशच्या रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सध्या ती घरी आयसोलेशनमध्ये आहे.

Web Title: thapki pyar ki actor irfan died due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.