नोरा फतेहीचं सौंदर्य पाहून सगळं काही विसरला हा टेरेंस, गीता म्हणाली - तोंड तर बंद करा अंकल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 02:28 PM2021-11-27T14:28:05+5:302021-11-27T14:31:11+5:30

Nora Fatehi : जेव्हा त्याच्यासमोर नोरा आली तर तो इतका हरवून गेला की, तो मलायकालाही विसरला. यावरून कोरिओग्राफर गीता कपूरने त्याची गंमतही केली.

Terence Lewis looked awe after seeing Nora Fatehi ignored Malaika Arora | नोरा फतेहीचं सौंदर्य पाहून सगळं काही विसरला हा टेरेंस, गीता म्हणाली - तोंड तर बंद करा अंकल...

नोरा फतेहीचं सौंदर्य पाहून सगळं काही विसरला हा टेरेंस, गीता म्हणाली - तोंड तर बंद करा अंकल...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सौंदर्याची चर्चा सगळीकडे रंगलेली असते. जेव्हा ती समोर येते, तेव्हा तिचे फॅन्स तिला बघतच राहतात. असंच काहीसं कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबतही झालं. जेव्हा त्याच्यासमोर नोरा आली तर तो इतका हरवून गेला की, तो मलायकालाही विसरला. यावरून कोरिओग्राफर गीता कपूरने त्याची गंमतही केली.

नोरावर फिदा टेरेंस

नोरा फतेही (Nora Fatehi) या वीकेंडला 'बेस्ट डान्सर सीजन २' मध्ये गेस्ट बनून येणार आहे. शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात नोरा तिचा जबरदस्त बेली डान्स दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मजेदार बाब ही आहे की, येणाऱ्या एसिपोडच्या प्रोमोत दाखवण्यात आलं की, कशाप्रकारे शो चा जज टेरेंस लुईस त्याची हॉट को-जज मलायका अरोराला इग्नोर करत फक्त नोराकडे बघत आहे.

गीताने घेतली मजा

प्रोमोची सुरूवात नोराची स्टेजवर येण्याने आणि टेरेंस आपल्या सीटवरून उठून वेलकम करण्यापासून होते. टेरेंस म्हणतो की, 'वेलकम बॅक नोरा'. तेव्हा गीता कपूर त्याला अडवत म्हणते की, 'त्यासाठी मनीष आहे'. त्यानंतर नोरा जेव्हा बेली डान्स करते तेव्हा टेरेंस एकदम अवाक् होऊन तिच्याकडे बघत असतो. यावरही गीता त्याला म्हणते की, 'अरे मुंह तो बंद करो अंकल'. गीताचं हे वाक्य ऐकून सगळेच हसू लागतात. 

नोरा आणि टेरेंसची केमिस्ट्री

एका दुसऱ्या सेगमेंटमध्ये मलायकाने नोराला विचारलं की, 'तू टेरेंसला मिस केलं का?'. नोरा सांगते की, 'नक्कीच, मी त्याला मिस केलं. टेरेंससोबत डान्स करून नेहमीच चांगलं वाटतं'. टेरेंस नोराला धन्यवाद देत तिचा हात पकडतो. 
 

Web Title: Terence Lewis looked awe after seeing Nora Fatehi ignored Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.