रिलेशनशिपबाबत काय बोलून गेली तेजश्री प्रधान, तिच्या पोस्टची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 11:42 AM2021-05-28T11:42:24+5:302021-05-28T11:44:49+5:30

तेजश्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण या पोस्टमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे.

tejashree pradhan is in committed relationship with coffee | रिलेशनशिपबाबत काय बोलून गेली तेजश्री प्रधान, तिच्या पोस्टची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

रिलेशनशिपबाबत काय बोलून गेली तेजश्री प्रधान, तिच्या पोस्टची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देतेजश्रीने झोपाळ्यावर बसलेला तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती निवांत बसलेली दिसत असून तिच्या हातात कॉफीचा मग दिसत आहे.

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण या पोस्टमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे.

तेजश्रीने झोपाळ्यावर बसलेला तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती निवांत बसलेली दिसत असून तिच्या हातात कॉफीचा मग दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिलेले कॅप्शन खूपच इंटरेस्टिंग आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, मी कॉफीच्या अधीन गेलेले नाहीये तर आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. 

तेजश्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा फोटो 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. 

तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. या मालिकेआधी तिने झेंडा या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. अग्गंबाई सासूबाई या नुकत्याच संपलेल्या तिच्या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

Web Title: tejashree pradhan is in committed relationship with coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.