'तारक मेहता' फेम चंपकलालच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, बबीताजीला देखील सौंदर्यात देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:29 PM2021-06-17T20:29:11+5:302021-06-17T20:29:39+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते.

'Tarak Mehta' fame Champaklal's real life wife is very beautiful, Babitaji also gives a bump in beauty | 'तारक मेहता' फेम चंपकलालच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, बबीताजीला देखील सौंदर्यात देते टक्कर

'तारक मेहता' फेम चंपकलालच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, बबीताजीला देखील सौंदर्यात देते टक्कर

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेतील चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते. मालिकेतील चाचाजी आणि जेठालालचे वडील चंपकलाल म्हणजेच अमित भटच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात. 


चंपकलाल गडा म्हणजेच अमित भट खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक आहे. तो नेहमी आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्याच्या पत्नीचे नाव कृती भट असून ती दिसायला खूप सुंदर आहे. कृती तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर येत असते आणि तिचे या मालिकेतील सर्व कलाकारांसोबत चांगले संबंध आहे. तसेच तिचे महिला मंडळींसोबत खूप चांगली मैत्री आहे.


अमित भट आणि कृती भटला दोन मुले आहेत. दोघेही खूप क्युट आहेत. त्याचा एका मुलाने देखील तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये अभिनय केला आहे आणि काही भागात टप्पूच्या मित्राच्या भूमिकेत दिसला होता.


अमित भट आणि कृती भटच्या मुलांची नाव देव आणि दीप आहे. देव सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि फनी व्हिडीओ पोस्ट करत असतो. या व्हिडीओत अमित आणि कृतीदेखील पहायला मिळतात. 


अमित भट आणि कृती भट या दोघांना नवीन नवीन ठिकाणी फिरायला खूप आवडते आणि दोघे एकमेकांचे ट्रॅव्हल पार्टनर देखील आहेत. 

Web Title: 'Tarak Mehta' fame Champaklal's real life wife is very beautiful, Babitaji also gives a bump in beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.