'तारक मेहता...'मधील आत्माराम भिडेच्या निधनाचा मेसेज ही निव्वळ अफवा; स्वतः कलाकारानेच केलं LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:17 PM2022-05-17T16:17:28+5:302022-05-17T17:16:43+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका अभिनेता मंदार चंदावरकर(Mandar Chandavarkar)ने साकारली आहे. नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Bhide aka Mandar Chandwadkar debunks death rumors | 'तारक मेहता...'मधील आत्माराम भिडेच्या निधनाचा मेसेज ही निव्वळ अफवा; स्वतः कलाकारानेच केलं LIVE

'तारक मेहता...'मधील आत्माराम भिडेच्या निधनाचा मेसेज ही निव्वळ अफवा; स्वतः कलाकारानेच केलं LIVE

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका मंदार चंदावरकर(Mandar Chandavarkar)ने साकारली आहे. काही वेळापूर्वी मंदारच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर आता अभिनेत्याने इंस्टाग्राम लाईव्हवर येऊन या वृत्ताचे खंडन केले आहे. अभिनेता मंदार चंदावरकर म्हणाला, तो पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी देखील आहे. 

मंदार चंदावरकरच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र या वृत्तात अजिबात तथ्य नाही. आता खुद्द मंदारने इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन तो ठणठणीत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की सर्व काही ठीक चालले आहे. मी पण काम करत आहे. काही वेळापूर्वी एका व्यक्तीने मला ही बातमी फॉरवर्ड केली होती, म्हणून मला वाटले लाइव्ह जाऊन सर्वांचे गैरसमज दूर करावे. माझे चाहते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अफवा अधिक वेगाने पसरतात. मला फक्त पुष्टी करायची आहे की मी शूटिंग करत आहे आणि एन्जॉय करत आहे.

मंदार चंदावरकर पुढे म्हणाला की, जो कोणी ही बातमी पसरवत आहे, त्याला मी विनंती करतो की त्यांनी हे सर्व करणे थांबवावे. देव त्याला 'बुद्धी' देवो. तारक मेहता का उल्टा चष्माचे सर्व कलाकार निरोगी आणि आनंदी आहेत. प्रत्येकाला भविष्यात अधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे आणि त्याच प्रकारे लोकांचे मनोरंजन व्हावे ही आशा आहे.

मंदार चंदावरकरच नाही तर याआधी दिव्यांका त्रिपाठी, मुकेश खन्ना, श्वेता तिवारी आणि शिवाजी साटम यांच्या मृत्यूची बातमीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. कलाकारांना पुढे येऊन मुलाखती द्याव्या लागल्या आणि त्यांच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली होती.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Bhide aka Mandar Chandwadkar debunks death rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.