Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'गोगी' समय शहा म्हणाला- माझ्यावर कोणातच हल्ला झाला नाही

By गीतांजली | Published: November 2, 2020 12:40 PM2020-11-02T12:40:49+5:302020-11-02T12:41:23+5:30

समयने सांगितले त्याच्यावर कोणताच हल्ला झालेला नाही

Taarak mehta ka ooltah chashmah gogi samay shah said i have not been attacked | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'गोगी' समय शहा म्हणाला- माझ्यावर कोणातच हल्ला झाला नाही

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'गोगी' समय शहा म्हणाला- माझ्यावर कोणातच हल्ला झाला नाही

googlenewsNext

लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील समय शहावर कोणताच हल्ला झालेला नाही. त्यानेच ही माहिती स्वत: दिली आहे. याआधी मीडियामध्ये अशा बातम्यां आल्या होत्या की समयवर त्याच्या बिल्डिंग बाहेरील एका ग्रुपमधील मुलांनी हल्ला केला. 

समय शहाने सांगितले असे काहीही झालेले नाही. समयने सांगितले त्याच्यावर कोणताच हल्ला झालेला नाही. घराबाहेरील एका व्यक्तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने सांगितले लॉकडाऊन पूर्वी यासगळ्या गोष्टी झाल्या होता. समय शाह 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये गोगी भूमिका साकारतो.    


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता असं त्याच्या आईने सांगितले. आईचा दावा आहे की, काही गुंड इमारतीच्या आवारात घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. याचा जाब विचारला असता गुंडांनी अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. समयसोबत ही तिसरी घटना घडल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. समयच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबतची तक्रार केली आहे. शुटींगवरुन परतल्यानंतर ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली. 

समयने ट्विट करत या सगळ्या गोष्टी केवळ अफवा असल्याच्या सांगितल्या आहेत. समयने ट्विट केले की,  बर्‍याच वृत्तवाहिन्यांवरून अशी अफवा पसरली आहे की मला 15 दिवस धमकावले जात आहे, परंतु हे सत्य नाही. ही घटना लॉकडाऊन होण्यापूर्वीची आहे, जेव्हा एका व्यक्तीने दुचाकीवरून येऊन मला शिवीगाळ केली व पळ काढला. दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीने माझ्या आईला शिवीगाळ केली व तेथून पळ काढला. 

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah gogi samay shah said i have not been attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.