Interesting Facts ! ‘मैनें प्यार किया’ होता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या जेठालालचा पहिला सिनेमा!!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 03:57 PM2020-05-24T15:57:49+5:302020-05-24T15:59:35+5:30

होय, दिलीप जोशी यांनी सलमान खानसोबतच्या एका सिनेमातून आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. या सिनेमाचे नाव होते, ‘मैनें प्यार किया’. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Dilip Joshi made his debut with Salman Khan's Maine Pyar Kiya-ram | Interesting Facts ! ‘मैनें प्यार किया’ होता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या जेठालालचा पहिला सिनेमा!!  

Interesting Facts ! ‘मैनें प्यार किया’ होता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या जेठालालचा पहिला सिनेमा!!  

googlenewsNext

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांना कोण ओळखत नाही? 12 वर्षांपासून दिलीप जोशी या मालिकेत काम करत आहेत. 2008 मध्ये ही मालिका सुरु झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दिलीप जोशी यांनी जेठालाल बनून अनेकांना खळखळून हसवले. पण या जेठालाल अर्थात दिलीप जोशींच्या पहिल्या सिनेमाबद्दल  तुम्हाला ठाऊक आहे?
होय, दिलीप जोशी यांनी फिल्म व टीव्ही इंडस्ट्रीत 30 वर्षे झाली आहेत. सलमान खानसोबतच्या एका सिनेमातून त्यांनी आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. या सिनेमाचे नाव होते, ‘मैनें प्यार किया’. 

होय, हाच दिलीप जोशी यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात दिलीप यांनी रामू नावाच्या नोकराची भूमिका साकारली होती. सिनेमातील त्यांचा रोल अगदीच छोटा होता. पण त्या काही मिनिटाच्या रोलमध्येही त्यांचा अभिनय नोटीस केला गेला होता.
सलमानसोबतच ‘हम आपके है कौन’ या सिनेमातही दिलीप यांनी काम केले होते. यात त्यांनी माधुरी दीक्षितचा कझिन भोला प्रसादची भूमिका साकारली होती.

रिअल लाईफमध्येही दिलीप जोशी विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. दिलीप आणि जयमाला जोशी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नियती हे मुलीचे तर ऋत्विक हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.  

वयाच्या 12 व्या वषार्पासून दिलीप यांनी थिएटरमध्ये अभिनयास सुरुवात केली. आपल्या पहिल्या नाटकात त्यांना पुतळ्याची भूमिका मिळाली होती. म्हणजे, 7-8 मिनिटे त्यांना केवळ पुतळा बनून उभे राहायचे होते.


 
‘पंछी एक डाल के’ या मालिकेतून दिलीप यांना ला टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला. यानंतर   जरा हटके या शोमध्येही त्यांची वर्णी लागली. पुढे हम आपके है कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, खिलाडी 420, वन टू का फोर अशा काही चित्रपटातही त्यांनी काम केले. पण एकवेळ अशी आली की, दिलीप यांना काम मिळेनासे झाले. होय, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळण्यापूवीर्ची ही गोष्ट.


 
एका मुलाखतीत दिलीप यांनी सांगितले होते की, अभिनयाच्या क्षेत्रात कशाचीही शाश्वती नाही. एकदा तुम्ही हिट झाला तरच काम मिळते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळण्यापूर्वी मी अन्य एका शोमध्ये काम करत होतो. पण हा शो बंद झाला. माझ्या हाती कुठले नाटकही नव्हते. दीड वर्ष माझ्या हाताला काम नव्हते. त्या काळात ही फिल्ड सोडून दुसरे काही करावे का, हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात आला होता.
 
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका एपिसोडसाठी दिलीप यांना  आज दीड लाख रुपये मिळतात.  

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Dilip Joshi made his debut with Salman Khan's Maine Pyar Kiya-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.