तुम्हाला माहिती आहे का ?, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठलालमुळेच बबीता जीची शोमध्ये झाली होती एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:37 PM2021-03-16T17:37:25+5:302021-03-16T18:03:39+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात

Taarak mehta ka ooltah chashmah babita ji role recommended by jethalal aka dilip joshi to munmun dutta | तुम्हाला माहिती आहे का ?, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठलालमुळेच बबीता जीची शोमध्ये झाली होती एंट्री

तुम्हाला माहिती आहे का ?, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठलालमुळेच बबीता जीची शोमध्ये झाली होती एंट्री

googlenewsNext

टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालालने आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांचे मन जिंकले आहे. गुजराती व्यावसायिकाच्या या पात्रामध्ये दिलीप जोशी यांनी आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना हसवले आहे. यासह जेठालाल आणि बबिता जी यांच्यातील रोमान्ससुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतो. शोमध्ये बबीता जीची व्यक्तिरेखा मुनमुन दत्ता साकारत आहे. बबिताजी आणि जेठालाल यांच्यातील मैत्री प्रेक्षकांना आवडते. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान जेठालाल यांनी बबिता जीच्या भूमिकेबाबत मोकळेपणे गप्पा मारायल्या.

दिलीप जोशी म्हणाले, जेव्हा मला जेठालालची व्यक्तिरेखा मिळाली, तेव्हा मी आणखी बरीच पात्र निवडण्यास मदत केली. मी मुनमुन दत्ताला रिकमेंड मीच केलं होतं.  दिलीप जोशी यांच्या म्हणण्यानुसार बबीता जीची भूमिका मुनमुन दत्तला देण्यात आली.

या शोला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah babita ji role recommended by jethalal aka dilip joshi to munmun dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.