त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध..., ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात अभिनेत्रीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:56 AM2021-12-02T11:56:51+5:302021-12-03T11:38:41+5:30

Sahkutumb Sahaparivar Controversy : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’  ही मालिका सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या मालिकेचे निर्माते व सहकलाकारांवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत, तक्रार दाखल केली होती.  

Swati Bhadave Files FIR Against Sahkutumb Sahaparivar’s Production Controller Swapnil Lokhande | त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध..., ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात अभिनेत्रीची तक्रार

त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध..., ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात अभिनेत्रीची तक्रार

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’  ( Sahkutumb Sahaparivar) ही मालिका सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या मालिकेचे निर्माते व सहकलाकारांवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत, तक्रार दाखल केली होती.  आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेच्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या अभिनेत्रीचं नाव स्वाती भदवे (Swati Bhadave ) असं आहे.  स्वाती भदवेने प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

स्वाती ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत अभिनेत्री नंदिता पाटकरची बॉडी डबल म्हणून काम करत होती.

स्वातीने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने आपबीती सांगितली. ती म्हणाली, ‘सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत मी नंदिता पाटकरच्या बॉडी डबलचं काम करत होते. मी खूप वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय. पण फक्त या मालिकेसाठी बॉडी डबल म्हणून काम करण्यास तयार झाले होते. नंदिता सेटवर नसल्यास किंवा तिला उशीर होत असल्याच तिची भूमिका मी साकारायचे. एक दिवस प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेनं माझा फोन नंबर मागितला. यानंतर पुण्यात काम करणार का? असं त्यांने मला विचारलं. मी होकार दिल्यावर, त्याबदल्यात मला काय देशील? असं त्याने मला विचारलं. मी कमिशन द्यायला तयार होते. पण त्याला वेगळंच काही हवं होतं. मी तुला कमिशन देईन असं मी म्हणाल्यावर, नाही मला आणखी काही तरी हवं आहे, असं तो मला म्हणाला. त्याला माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते. त्याबदल्यात तुला आणखी काम देईन असं तो म्हणाला होता. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. मी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय, पण पहिल्यांदा मला असा वाईट अनुभव आला होता. मी शांत बसणा-यांपैकी नाही. मी या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर त्याला अटक देखील झाली.

स्वातीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.  फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता अशा अनेक मालिका शिवाय क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे.

Web Title: Swati Bhadave Files FIR Against Sahkutumb Sahaparivar’s Production Controller Swapnil Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.