स्वराज्य बांधणीची यशोगाथा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:52 PM2019-11-19T12:52:02+5:302019-11-19T12:55:42+5:30

थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात  स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं  कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या  कटिबध्द  ही होत्या .

Swarajya JananiJija Mata | स्वराज्य बांधणीची यशोगाथा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

स्वराज्य बांधणीची यशोगाथा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

सरदारांची वर्दळ, युध्दाचे डावपेच, सल्लामसलत, न्यायनिवाड्यात जाणारा दिवस तर युध्दकलांचं प्रशिक्षण अशा वातावरणात पार पडलेलं जिजाचं बालपण. पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना बालपणीच असह्य झालेल्या जिजांनी  मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात  स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं  कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या  कटिबध्द  ही होत्या .


त्यांच्या  पोटी जन्माला आलेल्या शिवबाला युध्दकलेत पारंगत करणं असेल किंवा स्त्रियांचा सन्मान, इतकंच नव्हे तर जाती – धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर जिजाऊने केले. शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार  पाडतानाच  जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी चोख पणे  पार  पाडलं. शिवबानं बरोबरच अवघ्या मराठी  मुलखाचे भविष्य घडवणाऱ्या  अशा थोर माऊलीची गाथा सध्या सोनी मराठीच्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.


गेल्या काही दिवसांत या मालिकेच्या माध्यमातून समोर आलेलं जिजाऊचं हे कणखर व्यक्तिमत्त्व आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. जिजाऊ च्या बालपणा पासून ते आताच्या  कणखर धैर्यशाली जिजाऊ यांचा हा अनोखा प्रवास " स्वराज्यरजननी  जिजामाता " या मालिकेतून आपल्या समोर उलगडणार आहे .

बालपणीच जिजाऊ च्या   मनी रोवलं गेलेलं स्वराज्याचं बीज मूर्तरूपात पाहण्यासाठी तिची धडपड डॉ अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जिजा-शहाजीचं बालपण आता सरलं असून मोठ्या जिजाची भूमिका आता अमृता पवार या मालिकेत साकारत आहे. तर  शहाजींच्या भूमिकेत अभिनेता रोशन मनोहर विचार दिसणार आहे.

Web Title: Swarajya JananiJija Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.