ठळक मुद्दे अबिगेल व सनम हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यावर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक नावांचा खुलासा झाला आहे. आता ड्रग्ज प्रकरणी टीव्ही इंडस्ट्रीतील नावेही समोर आली आहेत. टीव्ही अभिनेत्री एबिगेल पांडे आणि तिचा बॉयफ्रेन्ड  सनम जौहर यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलवले आहे. आज सकाळी या दोघांच्या घरावर एनसीबीने धाड टाकली होती.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीला अबिगेल आणि सनम यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. ड्रग्ज पेडलर करमजीत आणि संकेत यांनी चौकशीत अबिगेल व सनम यांच्या नावाचा खुलासा केला. करमजीत व संकेतसह 18 लोकांना  ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. आत्तापर्यंत कोणाकोणाला ड्रग्ज सप्लाय केले, अशा अनेकांची नावे या लोकांच्या चौकशीतून उघड झाले आहे. यात अबिगेल व सनम या दोघांच्या नावाचा समावेश आहे.

कोण आहे अबिगेल व सनम
अबिगेल व सनम हे दोघे ‘नच बलिए’च्या 8 व्या सीझनमध्ये कपल म्हणून दिसले होते. हे दोघेही या शोचे फर्स्ट रनरअप होते. शोमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. अबिगेल व सनम हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. इन्स्टाग्रामवर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दोघे लग्न करणार, असेही मानले जात आहे.

सनम जौहर याला त्याच्या डान्ससाठी ओळखले जाते. सनम हा एक कोरिओग्राफर आहे. अनेक रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये त्याने कोरिओग्राफी केली आहे. ‘नच बलिए 9’मध्ये मधुरिमा तुली व आदित्य विशाल सिंग यांचा कोरिओग्राफर होता.
अबिगेल पांडेबद्दल सांगायचे तर ‘हमसे है लाइफ’ या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय ‘वो कया दिल में है’ आणि ‘जिंदगी विन्स’ या शोमध्येही तिने काम केलेय. सौभाग्य लक्ष्मी, सिलसिला बदलते रिश्तों का, शक्ती-अस्तित्व के एहसास की, सावधान इंडिया या मालिकांमध्येही ती दिसली आहे.

श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल

दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

हे आरोप खोटे, निराधार...
ड्रग्ज कनेक्शनमध्ये आत्तापर्यंत दीपिका पादुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग यांची नावे समोर आली आहेत. यात दिया मिझाचे नाव असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून केला जातो आहे. मात्र याबाबत एनसीबीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात  नाव समोर येताच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिले होते़ आपल्यावरील सर्व आरोप तिने फेटाळून लावले होते.
‘ माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळते. हे आरोप खोटे, निराधार आणि वाईट प्रवृत्तीतून करण्यात आले आहे. अशा पत्रकारितेचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल. मी खूप मेहनतीने आणि वर्षांनी माझे बनवलेले करिअर यामुळे उद्धवस्त होईल. मी माझ्या आयुष्यात कधीच ड्रग्ज खरेदी केले नाही आणि घेतलेही नाहीत,’असे तिने म्हटले होते.
 
दीपिकाचेही नाव!!
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने  केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण,N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा प्रकाश) अशी नावे समोर आली आहेत.  दीपिकाचे ड्रग्जसंबंधी चॅटही समोर आले आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतचे हे चॅट आहेत. त्यामुळे आता दीपिकालाही समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला करिश्मा प्रकाशची चौकशी करेल आणि गरज पडल्यास दीपिका पादुकोणलाही समन्स बजावला जाईल, असे एनसीबीच्या अधिका-यांनी  सांगितले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant drugs angle case abigail pande and sanam johar called ncb office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.