कोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहतेही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:59 PM2021-05-17T19:59:11+5:302021-05-17T20:01:51+5:30

गीताचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत. गीता अविवाहित असल्याचे सांगते. पण हे फोटो पाहिल्यानंतर गीताने गुपचूप लग्न तर केलं नाही ना? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

super dancer 4 judge geeta kapur wedding rumours spotted with sindoor | कोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहतेही हैराण

कोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहतेही हैराण

Next
ठळक मुद्दे काही काळापूर्वी गीता राजीव खिंचीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. गीता आणि राजीवचे सोशल मीडियावरील काही फोटोज पाहून काही मीडिया रिपोर्ट्सने हा दावा केला होता.

छोट्या पडद्यावर गीता मां या नावाने प्रसिध्द असलेली कोरियोग्राफर गीता कपूर (Geeta Kapur) सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर-4’ (Super Dancer 4 ) मध्ये दिसतेय. तूर्तास गीता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, तिचे काही फोटो तुफत्तन व्हायरल होत आहेत. या फोटोनंतर गीताने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
 शेअर केलेल्या फोटोत गीताने लाल रंगाचा अनारकी सूट घातला आहे आणि आश्चर्य म्हणजे तिच्या भांगात कुंकू आहे. फोटोत ती अगदी नववधूप्रमाणे दिसतेय.

गीताचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत. गीता अविवाहित असल्याचे सांगते. पण हे फोटो पाहिल्यानंतर गीताने गुपचूप लग्न तर केले नाही ना? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. लग्न केले तर कुणाशी? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.
आता गीताने खरंच लग्न केलं की नाही, हे येणा-या ‘सुपर डान्सर 4’च्या एपिसोडमध्येच कळू शकेल. कदाचित गीता स्वत: याबद्दल खुलासा करेल.

गीताने वयाच्या अवघ्या 15 वर्षी फराह खानचा ग्रुप जॉइन केला होता. यानंतर तिने फराहसोबत कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम,  मोहब्बते, कल हो न हो, 'ओम शांति ओम  सोबतच अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले. ऐवढेच नाही तर तिने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केलेय. गीताने   फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खां आणि तेरे नाल लव हो गया सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे.

 यासोबतच  टीव्हीवर डांस इंडिया डांस,  डीआईडी लिल चँप्स्स  आणि इंडियाज डांसिंग सुपरस्टार या शोजची ती जज आहे.
 काही काळापूर्वी गीता राजीव खिंचीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. गीता आणि राजीवचे सोशल मीडियावरील काही फोटोज पाहून काही मीडिया रिपोर्ट्सने हा दावा केला होता. परंतू गीता किंवा राजीव दोघांनीही या बातम्यांवर बोलणे टाळले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: super dancer 4 judge geeta kapur wedding rumours spotted with sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app