ठळक मुद्दे होय, सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ मुळे  ‘कानपूरवाले खुराणाज्’ बंद होणार आहे.  खुद्द सुनील ग्रोव्हरनेच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. पण या शोच्या चाहत्यांना निराश करणारी ही बातमी आहे. होय, लवकरच हा शो बंद होणार आहे. गत डिसेंबरमध्ये सुनील ग्रोव्हरचा हा शो सुरु झाला होता. प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला होता. पण आता हा शो बंद होणार आहे. आता याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सलमान खान. होय, सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ मुळे  ‘कानपूरवाले खुराणाज्’ बंद होणार आहे.
 खुद्द सुनील ग्रोव्हरनेच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

माझा शो माझ्यामुळेच बंद होतोय, असे सुनीलने यावेळी सांगितले. मी हा शो केवळ ८ आठवड्यांसाठीच साईन केला होता. कारण मी आधीच ‘भारत’ या चित्रपटासाठी माझ्या डेट्स दिल्या होत्या. मी प्रेस कॉन्फरन्स व अनेक मुलाखतीतही हे स्पष्ट केले होते. माझ्या हाती जितका वेळ होता, तितकाच मी देऊ शकलो. मी टीव्हीला खूप मिस करत होतो. ‘भारत’च्या शूटींगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे मी महिनाभराचा शो सत्कारणी लावला. असे सुनीलने सांगितले. काल गुरुवारपासून सुनील ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी झाला. पुढील दीड महिना ‘भारत’चे शूटींग चालणार आहे.


गत १३ डिसेंबरला ‘कानपूरवाले खुराणाज्’ आॅन एअर झाला होता. या शोमध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा, उपासना सिंह असे अनेक कलाकार होते. याशिवाय फराह खानही या शोचा भाग होती. ‘सिम्बा’च्या टीमने या पहिल्या शोमध्ये हजेरी लावली होती.


‘भारत’बद्दल सांगायचे तर यात भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय कॅटरिना कैफ, दिशा पटानी, तब्बू, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार यात आहेत. सुनील ग्रोव्हर यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

English summary :
Comedian Sunil Grover's 'Kanpur Wale Khuranas' is going to close soon. Sunil Grover's show was started in late December. Due Salman Khan's upcoming film 'Bharat' 'Kanpurwale Khurana' will stop.Sunil Grover himself has revealed this in an interview.


Web Title: sunil grover show kanpur wale khuranas closed due to this reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.