sunil grover shares funny video from his kitchen as a monkey took his dahi | सुनील ग्रोव्हरच्या किचनमध्ये शिरलं माकड, पाहा मजेदार व्हिडीओ

सुनील ग्रोव्हरच्या किचनमध्ये शिरलं माकड, पाहा मजेदार व्हिडीओ

ठळक मुद्देछोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या कॉमिक टायमिंगने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता व कॉमेडियन सुनील ग्रोव्हर  याने शेअर केलेला एक  व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओवर सध्या कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. व्हिडीओ कसला तर एका माकडाचा. 
एक माकड किचनमध्ये शिरतो आणि सगळ्यांचा डोळा चुकवत दही घेऊन पळून जातो, असे या व्हिडीओत दिसतेय. सुनील या व्हिडीओत दिसत नाही. कारण काय तर हा व्हिडीओ त्याने स्वत:च शूट केला आहे. ‘दही ले गया,’ या कॅप्शनसह सुनीलने हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 4 लाखांवर लोकांनी पाहिला.

सुनील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे कॉमेडी व्हिडीओ, फोटो चाहत्यांसह तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचा विनोदी अंदाज पाहता येतो. ऑनस्क्रीन असो या ऑफस्क्रीन सुनील ग्रोव्हर नेहमीच मेजशीर अंदाजात राहणे पसंत करतो. रसिकांना खळखळून हसवत असतो. त्यामुळे आज लाखोंच्या संख्येत सुनील ग्रोव्हरचे चाहते जगभरात पसरले आहेत.

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सुनिल आपल्या हटके मेजशीर अंदाजाने लक्ष वेधून घेत असतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sunil grover shares funny video from his kitchen as a monkey took his dahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.