सलमानच्या सांगण्यावरुनही कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास सुनील ग्रोवरने दिला नकार, वाचा आता पुन्हा काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:57 PM2021-02-20T17:57:50+5:302021-02-20T18:01:56+5:30

मुळात कलिप शर्माचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. शोमधील सगळे कॉमेडीयन घराघरांत लोकप्रिय बनले अशात. सुनिल ग्रोवर सा-यांमध्ये भाव खावून गेला

Sunil Grover refuses to work with Kapil Sharma again despite Salman Khan's Request, Read What Happened | सलमानच्या सांगण्यावरुनही कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास सुनील ग्रोवरने दिला नकार, वाचा आता पुन्हा काय घडलं

सलमानच्या सांगण्यावरुनही कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास सुनील ग्रोवरने दिला नकार, वाचा आता पुन्हा काय घडलं

googlenewsNext

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी एव्हरेडी असणा-या सुनील ग्रोवरने कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास नकार दिला आहे.'द कपिल शर्मा शो'च्या आगामी सीझनमध्ये गुथ्थी म्हणजेच सुनील ग्रोव्हर पुन्हा एंट्री करणार असल्याची चर्चा होती. मात्र ताज्या वृत्तानुसार, सुनीलने या शोसाठी स्पष्ट नकार कळवला असल्याचे समोर येत आहे.

 

सुनिल आणि कपिल या दोघांनी त्यांचा वाद विसरावा आणि पुन्हा एकदा एकत्र यावे अशी सलमानची ईच्छा होती. मात्र सुनिल ग्रोवरला आता हे अजिबात मान्य नसल्याचे दिसतंय. त्यामुळे त्याने सलमानलाही नकार कळवला आहे. एकत्र काम केल्यास पुन्हा गोष्टी बिघडू शकतात, असे सुनीलचे मत आहे. त्यामुळे त्याने सलमानला शोसाठी आपला नकार कळवल्याचे म्हटले जात आहे.


कपिल शर्मा आणि अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये झालेला वाद अख्या जगाला माहिती आहे. या वादानंतर सुनिलने कॉमेडी शर्मा शो सोडत दुसरा नवीन कॉमेडी शो सुरू केला होता. मात्र त्या शोला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा शो बंद झाला. त्यानंतर आता सुनिल ग्रोवर सिनेमांकडे वळला. आपल्याला विविध सिनेमातून त्याचे दर्शन घडतच असते.


मुळात कलिप शर्माचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. शोमधील सगळे कॉमेडीयन घराघरांत लोकप्रिय बनले अशात. सुनिल ग्रोवर सा-यांमध्ये भाव खावून गेला. मात्र कुठे ना कुठे हा शो सुपरहिट ठरल्याचे श्रेय कपिलने कधीच टीमला दिले नाही. स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. अगदी तेसच काही कपिलसह झाले होते.

जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. स्वतःला मिळालेलं स्टारडम तो सांभाळू शकला नाही आणि वाट चुकला. विमानप्रवासात सहकलाकारांना मारहाण करणं इथपासून ते आपल्या शोमध्ये पाहुण्यांना वाट बघायला लावणं सगळं काही कपिलच्या विरोधात घडू लागलं. परिणामी या सगळ्या गोष्टींमुळे कपिल डिप्रेशनमध्ये गेला. स्वतःला तो बंद खोलीत कोंडून घेत असे. कुणाला भेटत नसे. त्यानं बंगळुरु इथं जाऊन डिप्रेशनवर उपचार देखील घेतले होते.

Web Title: Sunil Grover refuses to work with Kapil Sharma again despite Salman Khan's Request, Read What Happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.