ठळक मुद्देभारतच्या प्रमोशनला कतरिना आणि त्याच्यासोबत सुनील देखील उपस्थित असावा असे सलमानला वाटत होते. पण या कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुनीलने नकार दिला.

सुनिल ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यातील वादाला आता अनेक वर्षं झाली आहेत. ते दोघे हा वाद विसरून अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या आनंदात सहभागी होत असल्याचे आपल्याला दिसून येते. पण असे असले तरी सुनील कपिलसोबत झालेली भांडणं पूर्णपणे विसरला नाहीये असेच दिसून येत आहे.

कपिल शर्माने लग्नानंतर बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी एक मोठे रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. पण तिथे सुद्धा सुनीलने न जाणेच पसंत केले होते. पण त्याच्या भारत या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो आणि कपिल पुन्हा एकदा एकत्र येतील असा अंदाज लावला जात होता. मात्र सुनीलने कपिलच्या द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. त्यामुळे आता भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणेज सलमान खानच द कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे खूपच चांगले प्रमोशन तो करणार आहे. या प्रमोशनला कतरिना आणि त्याच्यासोबत सुनील देखील उपस्थित असावा असे सलमानला वाटत होते. पण या कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुनीलने नकार दिला असल्याचे वृत्त डिएनएने दिले आहे.

सुनीलने द कपिल शर्मा शो मध्ये यावे असे सलमानला वाटत असल्याचे सुनीलनेच काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते. एवढेच नव्हे हा निर्णय सुनीलने कोणत्याही दबावाखाली घेऊ नये असे सलमानने त्याला सांगितले असल्याचे देखील त्याने कबूल केले होते.

सलमानने ट्विटरवर फोटो पोस्ट करत तो आणि कतरिना द कपिल शर्मा शो मध्ये येणार असल्याचे सांगितले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत जीन्स, टी-शर्ट आणि जीन्स जॅकेटमध्ये तो हँडसम दिसत असून कतरिनाचे सौंदर्य साडीत खुलून आले आहे. 


Web Title: Sunil Grover refuses to join Salman Khan and Katrina Kaif to The Kapil Sharma show?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.