ठळक मुद्देभारत या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान या चित्रपटाची संपूर्ण टीमसोबत द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहे आणि त्यावेळी सुनील देखील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत सुनील द कपिल शर्मा शोमध्ये परत यावा अशी सलमानची इच्छा आहे. 

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या सिझन प्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या सिझन प्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. पण या कार्यक्रमाचे फॅन्स सुनील ग्रोव्हरला मिस करत आहेत. सुनीलने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले. पण या कार्यक्रमाच्या एका खास भागाच्या चित्रीकरणासाठी सिडनीला ही टीम गेली असता सुनील आणि कपिलची विमानात भांडणं झाली होती. कपिलने सुनीलला चांगलेच सुनावले होते. आणि त्यामुळे सुनीलने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शो मध्ये परत यावा अशी या कार्यक्रमाच्या फॅन्सची अनेक दिवसांपासून इच्छा आहे. सुनीलचा कानपूरवाले खुरानाज हा कार्यक्रम प्रेक्षकांना काही महिन्यांपूर्वी पाहायला मिळाला होता. पण भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुनीलने या कार्यक्रमाचे केवळ काहीच भाग केले. भारत या चित्रपटात सुनील सलमान खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. आणि द कपिल शर्मा शोचा निर्माता देखील सलमानच आहे. त्यामुळेच सुनील द कपिल शर्मा शो मध्ये परत येऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे. 

ओडिशाटिव्ही या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार भारत या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान या चित्रपटाची संपूर्ण टीमसोबत द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहे आणि त्यावेळी सुनील देखील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत एशियन एज या वर्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सुनील द कपिल शर्मा शोमध्ये परत यावा अशी सलमानची इच्छा आहे. 

सुनीलने द कपिल शर्मा शो मध्ये परतावे ह सगळ्यांचीच इच्छा असली तरी कपिल आणि सुनीलने अद्याप याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे.


Web Title: Sunil Grover To Join The Kapil Sharma Show In June This Year?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.