सुंदरा मनामध्ये भरलीमधील सज्जनरावने केले आहे वास्तवमध्ये काम, हा पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:51 PM2021-03-25T13:51:55+5:302021-03-25T13:55:55+5:30

संजय दत्तच्या वास्तव या चित्रपटात देखील सज्जनराव म्हणजेच संदेश यांनी काम केले आहे.

sundara manamadhe bharali sajjan aka sandesh upasham was worked in Vaastav | सुंदरा मनामध्ये भरलीमधील सज्जनरावने केले आहे वास्तवमध्ये काम, हा पाहा व्हिडिओ

सुंदरा मनामध्ये भरलीमधील सज्जनरावने केले आहे वास्तवमध्ये काम, हा पाहा व्हिडिओ

googlenewsNext
ठळक मुद्देसुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सज्जनराव ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सज्जनरावाच्या भूमिकेत आपल्याला संदेश उपशाम यांना पाहायला मिळत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सज्जनराव ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सज्जनरावाच्या भूमिकेत आपल्याला संदेश उपशाम यांना पाहायला मिळत आहे.

संदेश यांना सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण तुम्हाला माहीत आहे की, संदेश यांनी या मालिकेत काम करण्याआधी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. संजय दत्तच्या वास्तव या चित्रपटात देखील संदेश यांनी काम केले आहे. संदेश यांनीच त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. त्याचा हा पहिला चित्रपट होता.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सज्जनराव या व्यक्तिरेखेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा तयार केली आहे. लतिकाच्या प्रेमात पडलेले हे पात्र अगदी लहान मुलांसारखं आहे. साधा, पण प्रेमात वेडा झालेला सज्जनराव संदेश उपशाम यांनी उत्तम साकारला आहे.

संदेश यांना अभिनयाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. पण ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहेत. ते महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

या भूमिकेविषयी संदेश सांगतात, ही व्यक्तिरेखा ऐकल्यानंतर लगेचच मी या मालिकेसाठी होकार दिला. ही व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडली होती. ही मालिका सुरू झाल्यानंतर या मालिकेतील माझी बोलण्याची ढब आणि केसावरून हात फिरवण्याची स्टाईल लोकांना प्रचंड आवडते असे ते मला नेहमीच सांगतात. या दोन्ही गोष्टी मी या भूमिकेत स्वतः टाकल्या आहेत.

Web Title: sundara manamadhe bharali sajjan aka sandesh upasham was worked in Vaastav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.