Join us  

सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 6:00 AM

कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील... लोकप्रिय मालिका कोण ठरणार ... याची उत्कंठा रसिकांना लागून राहिली आहे.

ठळक मुद्देअभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले

रंग मायेचा, रंग भक्तीचा, रंग प्रेमाचा, रंग मैत्रीचा, रंग सुरांचा, रंग हास्याचा, रंग आपुलकीचा... गौरव आपल्या लाडक्या माणसांचा...!! कलर्स मराठी घेऊन येतंय.. सोहळा कुटुंबाचा, उत्सव आपुलकीचा कलर्स मराठी अवॉर्ड २०२०. मागील वर्षी आपल्या सगळ्यांवर ओढवलेल्या संकटात देखील रसिक प्रेक्षकांनी कलर्स मराठीवरील त्यांच्या आवडत्या मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखांवर जीवापाड प्रेम केले. मग ती सुंदरा मनामध्ये भरली सारखी मालिका असो, शुभमंगल ऑनलाईन असो वा जय जय स्वामी समर्थ ही मालिका असो... 

प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अल्पावधीत अढळ स्थान निर्माण केले... या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले… या कठीण परिस्थितीत देखील कलर्स मराठीच्या कुटुंबाबरोबरचं नातं रसिकांनी अबाधित राखलं. याच नात्याचा, या आपुलकीचा उत्सव म्हणजेच कलर्स मराठी अवॅार्ड २०२०! 

कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील... लोकप्रिय मालिका कोण ठरणार ... याची उत्कंठा रसिकांना लागून राहिली आहे. विविध पुरस्कारांबरोबरच कोविडच्या लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांना कृतज्ञता पूर्वक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तर मनोरंजन क्षेत्रात सामाजिक जाणिवेचे भान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेखक अरविंद जगताप यांनाही यावेळी गौरवण्यात आले. अशा विविध पुरस्कारांबरोबरच दिलखेचक नृत्ये, गाणी आणि धमाल प्रहसनांची मेजवानी सोहळ्यात रसिकांना मिळणार आहे. रसिकांचा लाडका अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले. 

विजेते पुढीलप्रमाणे -लोकप्रिय मालिका - सुंदरा मनामध्ये भरली लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी लोकप्रिय कुटुंब     - जहागीरदार  कुटुंब - सुंदरा मनामध्ये भरलीलोकप्रिय जोडी - रणजित - संजीवनी - राजा रानीची गं जोडी लोकप्रिय नायिका - लतिका - सुंदरा मनामध्ये भरली लोकप्रिय नायक - अभिमन्यू - सुंदरा मनामध्ये भरली  लोकप्रिय आई - पमा ( शंतनूची आई ) शुभमंगल ऑनलाईन  लोकप्रिय वडील -  बापू (लतिकाचे वडील ) सुंदरा मनामध्ये भरली लोकप्रिय सून -    शर्वरी - शुभमंगल ऑनलाईन लोकप्रिय सासू - इंदू  - सुंदरा मनामध्ये भरली लोकप्रिय सासरे - यशवंत - जीव झाला येडापिसा   लोकप्रिय भावंडं - अभिमन्यू - आशुतोष - सुंदरा मनामध्ये भरली  लोकप्रिय सूत्रसंचालक - स्पृहा जोशी - सूर नवा ध्यास नवा लोकप्रिय शीर्षकगीत - जय जय स्वामी समर्थलोकप्रिय स्त्री व्यक्तिरेखा - बेबी मावशी - राजा रानीची गं जोडी लोकप्रिय पुरुष व्यक्तिरेखा - सज्जन - सुंदरा मनामध्ये भरली लोकप्रिय सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा - मोनी -राजा रानीची गं जोडी लोकप्रिय सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा -  जलवा - जीव झाला येडापिसा  लोकप्रिय आजी - हंसा - सुखी माणसाचा सदरालोकप्रिय नकारात्मक - स्त्री व्यक्तिरेखा - आत्याबाई - जीव झाला येडापिसा  आणि ऐश्वर्या -शुभमंगल ऑनलाईनलोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा - श्रीधर- चंद्र आहे साक्षीला लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा    कृष्णप्पा : जय जय स्वामी समर्थ, सारजा : जय जय स्वामी समर्थ, मोरू : सुखी माणसाचा सदरा, मैना : सुखी माणसाचा सदरा

      घोषित पुरस्कार      लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा -चिमण - सुखी माणसाचा सदरा  लोकप्रिय पदार्पण स्त्री व्यक्तिरेखा -    संजीवनी - राजा रानीची गं जोडी लोकप्रिय पदार्पण - पुरुष व्यक्तिरेखा- स्वामी समर्थ - जय जय स्वामी समर्थलोकप्रिय दमदार स्त्री  व्यक्तिरेखा - सिद्धी: जीव झाला येडापिसा लोकप्रिय दमदार पुरुष व्यक्तिरेखा - शिवा : जीव झाला येडापिसा २०२० मधील विशेष सदाबहार व्यक्तिरेखा-    बाळूमामा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं  २०२० मधील विशेष सदाबहार मालिका - बाळूमामाच्या नावानं चांगभलं        

टॅग्स :कलर्स मराठी