काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:26 PM2021-07-23T15:26:48+5:302021-07-23T15:33:43+5:30

लॉकडाऊनमध्ये कामाच्या शोधात असल्याची पोस्ट सुमोनाने सोशल मीडियावर शेअर केली होती.

Sumona Chakravarti aka Bhuri Not Part of The Kapil Sharma Show's New Season? | काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन

काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन

googlenewsNext

कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कपिल सज्ज झाला आहे. नुकताच नव्या शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शोमधल्या सगळ्या कलाकारांनी कोरोना लस घेतल्याचा फोटो कपिल शर्माने शेअर केला होता.

 

या फोटोमध्ये सगळे कलाकार होते. फक्त भुरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती फोटोमध्ये नव्हती.सुमोना फोटोत न दिसल्यामुळे चाहत्यांनीही सुमोना या शोमध्ये दिसणार नसल्याचे तर्कवितर्क लावताना दिसले. सुमोना चक्रवर्तीने अजूनतरी याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कपिल शर्मा शोमध्ये सुमोनाला एका आठवड्यासाठी जवळपास 4 ते 6 लाख रुपये इतके मानधन मिळत असल्याचेही बोलले जाते. 

लॉकडाऊनमध्ये कामाच्या शोधात असल्याची पोस्ट सुमोनाने सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर शोची घोषणा झाल्यानंतरही तिने एक पोस्ट शेअर केली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने स्पष्टपणे काहीही लिहीले नव्हते. फक्त कोणत्या तरी कारणामुळे ती दुःखी असल्याचे पोस्टवरुन वाटत होते. सुमोनाच्या या  पोस्टवर चाहत्यांनीही तिला शो सोडला का ? असे प्रश्न विचारले होते.


सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. चाहतेही तिच्याशी निगडीत  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रचंड उत्सुक असतात. कपिल शोच्या सुरुवातीपासून सुमोना तिच्या खास विनोदी स्टाईलने रसिकांचे मनोरंजन करत आली आहे.

 

शोमधल्या इतर कलकारांप्रमाणे सुमोनाही रसिकांची तितकीच आवडती बनली आहे. त्यामुळे नव्याने सुरु होणा-या कपिल शर्मा शोमध्ये सुमोना दिसली नाही तर चाहतेही प्रचंड नाराज होणार हे मात्र नक्की.पुढच्या महिन्यात कपिल शर्मा शो नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Sumona Chakravarti aka Bhuri Not Part of The Kapil Sharma Show's New Season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.