'द कपिल शर्मा'मधील सुमोना चक्रवर्तीने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 11:02 AM2020-12-28T11:02:45+5:302020-12-28T11:22:48+5:30

सुमोना बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

Sumona chakraborty wishes her fans a merry christmas | 'द कपिल शर्मा'मधील सुमोना चक्रवर्तीने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

'द कपिल शर्मा'मधील सुमोना चक्रवर्तीने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

googlenewsNext

द कपिल शर्मा शोमधील भुरी म्हणजेट सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सुमोना तिच्या चाहत्यांशी तिचे फोटो आणि व्हिडिओंद्वारे संपर्कात राहते. कपिल शर्माच्या शोमध्ये कपिल आणि सुमोना यांच्यातील भांडण प्रेक्षकांना खूप आवडते. सुमोना बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सुमोनाने तिच्या फॅन्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये सुमोना ग्लॅमरस दिसतेय. फॅन्सनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. सुमोनाला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. काही दिवसांपूर्वी तिचे इन्स्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स झाले आहेत.

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने अभिनयातून काही वर्षांचा ब्रेक घेतला आणि तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.
 

Web Title: Sumona chakraborty wishes her fans a merry christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.