'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील माई आणि मल्हारच्या डान्सच्या व्हिडीओची होतेय चर्चा, एकदा पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 05:05 PM2021-11-27T17:05:42+5:302021-11-27T17:06:26+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी लग्नबेडीत अडकणार आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Mai and Malhar dance video goes viral, watch this video once | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील माई आणि मल्हारच्या डान्सच्या व्हिडीओची होतेय चर्चा, एकदा पहा हा व्हिडीओ

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील माई आणि मल्हारच्या डान्सच्या व्हिडीओची होतेय चर्चा, एकदा पहा हा व्हिडीओ

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये नुकतेच नवीन वळण आले आहे. कटकारस्थान करणाऱ्या शालिनीला वेड लागले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी लग्नबेडीत अडकणार आहे. त्यामुळे सध्या शिर्केपाटील यांच्या घरात लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच शिर्केपाटील कुटुंबातील सदस्यांचे रेट्रो लूकमधील प्री व्हेडिंग फोटोशूट समोर आले होते. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान मालिकेतील माई आणि मल्हार यांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील माईंचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनराव याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत माई म्हणजेच वर्षा उसगांवकर आणि कपिल होनराव हमाल दे धमाल चित्रपटातील ढाकूमाकूम या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. कपिलने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अखेर प्रतीक्षा संपली...माईसोबत रिल बनवलाच. हमाल दे धमालची ओरिजनल हिरोईन. या व्हिडीओला खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, क्या बात है.. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, वाह मस्त माई आणि मल्हार दादा. आणखी एका युजरने म्हटले की, वर्षा ताई तुम्ही २० वर्षांच्या दिसत आहात. तर एका युजरने प्री व्हेडिंगचा एपिसोड खूप चांगला असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Mai and Malhar dance video goes viral, watch this video once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.