sreesanth manager jibe dipika kakar after she won bigg boss12 trophy | Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!!
Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!!

दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १२ व्या सीझनची विजेती ठरली. दीपिकाने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि ३० लाख रूपये जिंकले. माजी क्रिकेटपटू श्रीसंत शोचा रनरअप ठरला. एकीकडे शो जिंकल्याने दीपिका आनंदात आहे तर श्रीसंत दु:खी. श्रीसंतचे चाहते तर या पराभवाने चांगलेच संतापले आहेत. यापैकीच एक म्हणजे, श्रीसंतची मॅनेजर रोनिता वर्मा. होय, श्रीसंत हरल्याने आणि दीपिका जिंकल्याने रोनिता इतकी चिडलीय की, तिला आपला राग आवरता आला नाही. मग काय, सोशल मीडियावर तिने आपली सगळी भडास काढली आणि ती काढताना तिने दीपिकाला नाही नाही ती दूषणे दिलीत.
होय, ‘कृपा करून, पुढल्यावेळी शोमध्ये सतसंग करणा-या लोकांना बोलवा किंवा मग शोचे नाव दीपिका माता का हलवा ठेवा,’ असे एक  ट्वीट तिने केले.
रोनिता केवळ इथेच थांबली नाही तर तिने दीपिकावर थेट निशाणा साधला. दीपिका, तू हा शो जिंकण्याच्या लायकीचीच नव्हती. नकली शो की नकली विनर..., असे तिने लिहिले.
अर्थात कलर्स वाहिनेने रोनिताचे हे  ट्वीट रिट्वीटकरत, तिला तिच्याच शब्दांत उत्तर दिले. ‘दीपिकाच्या या अंदाजावर भाळणारेही चाहते आहेत,’ असे कलर्स वाहिनीने लिहिले.
 दीपिकासह श्रीसंत, दीपक ठाकुर , करणवीर बोहरा, रोमिल चौधरी हे सगळे ‘बिग बॉस 12’च्या फायनलमध्ये होते. दीपक ठाकूरने २० लाख रूपये घेऊन शोमधून बाहेर होणे पसंत केले. यानंतर करणवीर आणि रोमिल हे दोघे एलिमिनेट झालेत. यापश्चात दीपिका आणि श्रीसंत यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होती.मात्र श्रीसंतला मागे टाकत दीपिकाने बाजी मारली.  


Web Title: sreesanth manager jibe dipika kakar after she won bigg boss12 trophy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.