Sohan Chauhan, India’s Got Talent and MasterChef India post-producer, found dead in suspicious circumstances | इंडियाज गॉट टॅलेंट व मास्टर शेफ इंडिया शोचा निर्माता सोहन चौहानचे निधन, तलावात सापडला मृतदेह
इंडियाज गॉट टॅलेंट व मास्टर शेफ इंडिया शोचा निर्माता सोहन चौहानचे निधन, तलावात सापडला मृतदेह

रिएलिटी शोचा निर्माता सोहन चौहान याचे निधन झाले. त्याचा मृतदेह मुंबईतील आरे कॉलनी येथील रॉयल पाम्स तलावात सापडला. सोहनने इंडियाज गॉट टॅलेंट सीझन ७ व मास्टर शेफ इंडिया सीझन ६ची निर्मिती केली होती. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, १६ जूनच्या रात्री सोहनचा मृतदेह तलावात सापडला. त्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गोरगावमधील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. सोहनच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. 
सूत्रांच्या माहितीनुसार, सोहनचा मृत्यू झाला तेव्हा तो मुंबईत एकटाच राहत होता. त्याची पत्नी दिल्लीत होती.सोहनच्या घरी शेवटचे त्याला त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने १५ जूनला पाहिलं होतं. सोशल मीडियावर तो १३ जूनपर्यंत सक्रीय होता. सोहनने शेवटची पोस्ट सा रे गा मा पाच्या अंतिम सोहळ्याबद्दल केली होती. 
सोहनला कवितांची आवड होती. त्याने कवितांशी संबंधित बरेचसे पोस्ट सोशल मीडियावर केले होते. 
 

English summary :
Reality show producer Sohan Chauhan passed away. His body was found in the Royal Palms Lake at Aare Colony in Mumbai. Sohan Produces India's Got Talent Season 7 and Master Chef India Season 6.


Web Title: Sohan Chauhan, India’s Got Talent and MasterChef India post-producer, found dead in suspicious circumstances
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.