ठळक मुद्देशक्तीच्या आजोबांचे नाव हे चंद्रशेखर वैद्य असून ते प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चा चा चा या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

दिल मिल गये, तेरे लिये, अगले जन्म मोहे बिटियाँ ही किजो, ये है आशिकी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये शक्ती अरोराने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नव्हे तर नच बलिये या रिअॅलिटी शो मध्ये देखील तो झळकला होता. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचा हा लाडका अभिनेता एका प्रसिद्ध अभिनेत्याचा नातू आहे आणि त्याने नुकताच त्याच्या आजोबांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

शक्ती अरोरा हा छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून तो मालिकांपासून दूर आहे. सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत त्याला आपल्याला गेल्या वर्षी पाहायला मिळाले होते. शक्ती मालिकांमध्ये काम करत नसला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असतो.

शक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सध्या त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे. कारण यात त्याच्यासोबत त्याच्या आजोबांना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या आजोबांचे नाव हे चंद्रशेखर वैद्य असून ते प्रसिद्ध अभिनेते आहेत. शक्तीने या फोटोसोबत एक छान कॅप्शन देखील लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझे आजोबा नेहमीच आनंदी असतात हे त्यांच्या या स्माईलवरून तुम्हाला कळलेच असेल. ते ९६ वर्षांचे असले तरी चांगलेच तंदुरुस्त आहेत.

शक्ती अरोराने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांने त्याच्या आजोबांकडून अभिनयासंबंधीत अनेक गोष्टी शिकल्या आहेत. चंद्रशेखर यांनी अनेक ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चा चा चा या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून २००० साली त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. 


Web Title: Silsila Badalte Rishton Ka’s Shakti Arora shares a picture with 96-year-old grandfather and veteran actor Chandrashekhar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.