शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर सिद्धार्थ शुक्लाने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 05:20 PM2021-02-26T17:20:20+5:302021-02-26T17:24:10+5:30

विशेष म्हणजे शहनाज ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाते.  'बिग बॉस १३' शोनंतर शहनाजचे मेकओव्हर करत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता.

Sidharth Shukla on Wedding Rumours With Shehnaaz Gill, THIS is What He Has To Say | शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर सिद्धार्थ शुक्लाने सोडले मौन

शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर सिद्धार्थ शुक्लाने सोडले मौन

googlenewsNext

'बिग बॉस १३' सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल ही जोडी प्रचंड चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात अनेकदा सिद्धार्थ रागात असताना शहनाझ त्याला शांत करताना दिसली होती. दोघंही नेहमीच एकमेकांची काळजी घेताना दिसली होती. ‘बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.आता पुन्हा हे कपल चर्चेत आले आहे. सिद्धार्थ आणि शहनाज दोघांचे अफेअरच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. मात्र लग्नाच्या फोटोने तर चाहत्यांनाही चांगलेच संभ्रमात टाकले आहे. लग्नाचा फोटो पाहून चाहत्यांना त्यांचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असेही वाटत आहे. पण यावर खुद्द सिद्धार्थनेच स्पष्टीकरण दिले आहे. 


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. दोघांना सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे म्हणून त्यांनी ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे,अशा चर्चा सुरू होत्या. सिद्धार्थने त्याच्या आणि शहनाजच्या लग्नाबद्दल होण्याऱ्या सर्व चर्चांना आता उत्तरच दिले आहे. या चर्चांना काही अर्थ नसल्याचं आता खुद्द सिद्धार्थ शुक्लानं म्हटलं आहे. त्यानं शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर खुलासा केलाय. लग्न झालं नसल्याचं सिद्धार्थनं स्पष्ट केलं आहे.

विशेष म्हणजे शहनाज ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाते.  'बिग बॉस १३' शोनंतर शहनाजचे मेकओव्हर करत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता. अगदी स्लिमट्रीम अंदाजात ती चाहत्यांसमोह अवतरली होती. या नव्या अवतारातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती अगदीच स्लिम दिसत असल्यामुळे तिच्या लूकमध्येही बदल झाला होता.

 वजन कमी करण्याच्या नादात शहनाज भलतीच अशक्त दिसू लागलीये असे अनेकांना वाटले होते.  अलीकडे सिद्धार्थ शुक्लासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये वजन कमी करण्यासाठी मी डायटिंग करत असल्याची कबुली शहनाजने दिली होती. चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी वजन कमी करत असल्याचेही तिने सांगितले होते.

Web Title: Sidharth Shukla on Wedding Rumours With Shehnaaz Gill, THIS is What He Has To Say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.