पुन्हा सुरु होणार ‘बिग बॉस 13’चा ‘अनदेखा तडका’, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:05 PM2020-03-20T13:05:46+5:302020-03-20T13:07:18+5:30

‘बिग बॉस 13’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी

sidharth shukla asim riaz shehnaaz gill bigg boss 13 is all set to start again-ram |  पुन्हा सुरु होणार ‘बिग बॉस 13’चा ‘अनदेखा तडका’, वाचा सविस्तर

 पुन्हा सुरु होणार ‘बिग बॉस 13’चा ‘अनदेखा तडका’, वाचा सविस्तर

googlenewsNext
ठळक मुद्देशहनाज व सिद्धार्थ यांच्यातील खास क्षणही दाखवण्याचाही चॅनलचा विचार आहे. 

बिग बॉस 13’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. ‘बिग बॉस 13’ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय सीझन ठरले. या शोला मिळालेल्या टीआरपीने सर्व विक्रम मोडले. सिद्धार्थ शुक्ला व आसिम रियाज यांच्यातील वाद, सिद्धार्थ व शहनाज गिल यांची जबरदस्त   केमिस्ट्री अशा सगळ्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. हेच नाही आसिम रियाज व हिमांशी खुराणाचा लव्ह अँगलही प्रेक्षकांना भावला.

 नुकतेच ‘बिग बॉस 13’चे संपले. सिद्धार्थ शुक्ला शोचा विजेता ठरला. यानंतर लगेच शहनाज गिल व पारस छाब्राचा ‘मुझसे शादी करोगे’ हा शो सुरु झाला. पण हा शो ‘बिग बॉस 13’सारखी लोकप्रियता मिळवू शकला नाही. ‘मुझसे शादी करोगे’चा फॉर्मेट वेगळा होता. पण ‘बिग बॉस 13’च्या घरातच हा शो शूट झाला. कदाचित म्हणूनच प्रेक्षकांना हा शो इतका भावला नाही. अशात आता कलर्स वाहिनी पुन्हा एकदा ‘बिग बॉस 13’ घेऊन येतेय. याचे कारण म्हणजे, कोरोना.


होय, कोरोनामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री ठप्प आहे. सर्वच मालिकांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. सगळे कलाकार आपआपल्या घरात बंद आहेत. अशात कलर्स वाहिनीने ‘बिग बॉस 13’मधील टीव्हीवर न दाखवला गेलेला मसाला पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. शहनाज व सिद्धार्थ यांच्यातील खास क्षणही दाखवण्याचाही चॅनलचा विचार आहे. 


तूर्तास ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. अशात ‘बिग बॉस 13’ पुन्हा दाखवले जाणार असेल तर त्याचा नव्या सीझनलाही फायदा होऊ शकतो, हाही एक उद्देश आहेच.

Web Title: sidharth shukla asim riaz shehnaaz gill bigg boss 13 is all set to start again-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.