डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:22 AM2018-01-04T07:22:48+5:302018-01-04T12:52:48+5:30

झी युवा वाहिनीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनचे बिगुल फुंकले आणि म्हणता म्हणता या आवाहानाला महाराष्ट्रभर प्रचंड ...

Siddharth Jadhav will appear in the role of examiner in Maharashtra Dance | डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ जाधव

डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ जाधव

googlenewsNext
युवा वाहिनीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनचे बिगुल फुंकले आणि म्हणता म्हणता या आवाहानाला महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर  आणि मुंबई या शहरांमध्ये  झालेल्या ऑडिशनमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला. संपूर्ण स्पर्धेत सुमारे ५००० ते ६००० स्पर्धकांनी विविध गावांमधून आणि शहरांमध्ये येऊन आपले टॅलेंट सादर केले. झी युवा वाहिनीने 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाच्या प्रत्येक शहरातील ऑडिशनमधून अतिशय उत्कृष्ट आणि गुणी स्पर्धक निवडले आहेत. झी युवा येत्या २४ जानेवारी पासून टॉप ९० स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ५००० ते ६००० स्पर्धकांतून निवडलेले हे ९० स्पर्धक सर्वच बाबतीत उत्कृष्ट असतील. 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाच्या ऑडिशन दरम्यान संपूर्ण स्पर्धकांचा जोश आणि उत्साह एवढा होता की त्यामुळे ऑडिशन भोवतालचा संपूर्ण परिसर "DMD DMD म्हणजेच डान्स महाराष्ट्र डान्स' च्या घोषणांनी दुमदुमत होता. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी झी युवा वाहिनीवरील अंजली, फुलपाखरू, बापमाणूस, देवाशप्पथ या मालिकांतील कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. सुरुची अडारकर, ऋता दुर्गुळे, यशोमान आपटे, सुयश टिळक, श्रुती अत्रे, क्षितीश दाते, शाल्मली टोळये, कौमुदिनी असे अनेक कलाकार वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचले. या कलाकारांबरोबरच या कार्यक्रमाचे परीक्षक सिद्धार्थ जाधव, आदित्य सरपोतदार आणि फुलवा खामकर यांनीही वेगवेगळ्या शहरांमध्ये येऊन स्पर्धकांना प्रोत्सहन दिले. झी युवा डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी हे सगळेच सेलिब्रेटी प्रचंड उत्सुक आहे. सिद्धार्थ जाधवने नुकतीच त्याचे एकाहून एक सुंदर परफॉर्मन्स नच बलिये या कार्यक्रमात सादर केले होते. त्यामुळे तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला डान्सर असल्याचे प्रेक्षकांना कळले आहे. या कार्यक्रमात सिद्धार्थचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या होस्टच्या भूमिकेत सुव्रत जोशी झळकणार आहे. दिल दोस्ती दुनियादारी या कार्यक्रमामुळे सुव्रत प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. 

Also Read : सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधव दिसणार चाबी या शॉर्ट फिल्ममध्ये

Web Title: Siddharth Jadhav will appear in the role of examiner in Maharashtra Dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.