Shweta Tiwari : 'माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे', या वादग्रस्त वक्तव्यासाठी श्वेता तिवारीने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:45 PM2022-01-28T16:45:16+5:302022-01-28T16:46:00+5:30

Shweta Tiwari Controvercial Statement : एका वेब सीरिजच्या इव्हेंटमध्ये श्वेता म्हणाली होती की, 'माझ्या ब्रा चं माफ देव घेत आहे'. तिच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Shweta Tiwari: Shweta Tiwari issued statement clarify on controversial remark on god | Shweta Tiwari : 'माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे', या वादग्रस्त वक्तव्यासाठी श्वेता तिवारीने मागितली माफी

Shweta Tiwari : 'माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे', या वादग्रस्त वक्तव्यासाठी श्वेता तिवारीने मागितली माफी

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ब्रा आणि देवावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून (Shweta Tiwari Controversial Statement) चर्चेत आहे. झालं असं की, अभिनेत्री विरोधात एफआयआरही दाखल झाला होता. एका वेब सीरिजच्या इव्हेंटमध्ये श्वेता म्हणाली होती की, 'माझ्या ब्रा चं माफ देव घेत आहे'. तिच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाद इतका वाढला की, अभिनेत्रीने तिची बाजू सांगण्यासाठी अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. ज्यात तिने माफीही मागितली आहे.

श्वेताने दिलं स्पष्टीकरण

श्वेता म्हणाली की, तिचा कुणाच्याही धार्मिक भावनांना दुखवण्याचा उद्देश नव्हता. श्वेताने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागितली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. ती स्वत: देवावर विश्वास ठेवते. असं ती कधीच करू शकत नाही.

काय म्हणाली श्वेता?

श्वेताने स्टेटमेंटमध्ये लिहिलं की,  मला समजलं आहे की, माझ्या एका कलीगच्या आधीच्या रोलवरून मी केलेल्या वक्तव्याला चुकीचं समजलं जात आहे. जेव्हा याचा संदर्भ लावला जाईल तेव्हा समजून येईल की, देवाचा रेफरन्सने केलेलं वक्तव्य सौरभ राज जैनच्या पॉप्युलर देवाच्या रोलच्या संदर्भात करण्यात आलं होतं. लोक भूमिकांच्या नावाने कलाकारांना ओळखतात. त्यामुळे मीडियासमोर चर्चा सुरू असताना मी ते वक्तव्य उदाहरण म्हणून दिलं होतं.

'मात्र, या वक्तव्याला पूर्णपणे चुकीचं समजण्यात आलं आहे. जे बघून दु:खं होतं. मी स्वत: देवावर विश्वास ठेवते, त्यामुळे मी चुकूनही असं बोलू शकत नाही किंवा बोलणार नाही ज्याने लोकांच्या भावना दुखावतील. मला लक्षात आलं आहे की, ते वक्तव्य संदर्भ न ऐकता वाचल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा की, कुणालाही दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी विनम्रपणे माफी मागते'.
 

Web Title: Shweta Tiwari: Shweta Tiwari issued statement clarify on controversial remark on god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.