‘लागीर झालं जी’ मालिकेचा असा झाला जन्म,अभिनेत्रीपासून यशस्वी मालिका निर्माती बनलेल्या श्वेता शिंदेकडून गुपित उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 05:50 AM2017-11-18T05:50:19+5:302017-11-18T11:20:19+5:30

छोट्या पडद्यावर ‘लागीर झालं जी’ ही मालिका गाजत आहे. मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी रंगते आहे. त्यातच ...

Shweta Shinde, who was a successful series producer, was born as the 'Lageer Jhaal ji' series. | ‘लागीर झालं जी’ मालिकेचा असा झाला जन्म,अभिनेत्रीपासून यशस्वी मालिका निर्माती बनलेल्या श्वेता शिंदेकडून गुपित उघड

‘लागीर झालं जी’ मालिकेचा असा झाला जन्म,अभिनेत्रीपासून यशस्वी मालिका निर्माती बनलेल्या श्वेता शिंदेकडून गुपित उघड

googlenewsNext

/>छोट्या पडद्यावर ‘लागीर झालं जी’ ही मालिका गाजत आहे. मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी रंगते आहे. त्यातच अजिंक्य लष्करात भरती झाला असून ट्रेनिंगसाठी रवाना झाला आहे. एकीकडे अजिंक्य आणि शीतलच्या मनाची तगमग तर दुसरीकडे खडतर अजिंक्यचं लष्कराचं खडतर प्रशिक्षण यामुळे मालिका दिवसेंदिवस रसिकांना भावते आहे. भारतीय जवान, देशप्रेम हा मालिकेच्या कथेचा मुख्य गाभा आहे. रसिकांची मने जिंकणा-या या मालिकेची निर्माती एक मराठमोळी अभिनेत्री आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने या मालिकेची निर्मिती केली आहे. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदे हिने भूमिका साकारल्या होत्या. आता 'लागीर झालं जी' या मालिकेच्या निमित्ताने एक यशस्वी निर्माती म्हणून श्वेताने छाप पाडली आहे. लागीर झालं जी ही मालिका करण्यामागेही खास कारण आहे. श्वेता ही मूळची सातारा जिल्ह्याची आहे. सातारा जिल्ह्यातून अनेक वीर जवान भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहेत. साता-याला मोठी सैनिकी परंपरा लाभली आहे. एका कार्यक्रमासाठी अभिनेत्री असताना श्वेता कारगिलला गेली होती. त्यावेळी साता-याचे सैनिक पाहून लष्करात असल्याचे तिला कळले. साता-याचे अनेक जवान देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार आहेत ही बाब श्वेताला जाणवली. त्याचवेळी आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं श्वेताला वाटले. हाच विचार सुरु असताना एकदा श्वेताची आणि तेजपाल वाघ या तरुण लेखकाशी भेट झाली. चर्चा करताना तेजपाल श्वेताला कथा सांगू लागले आणि ही कथा होती भारतीय जवानांवर. त्याचवेळी या कथेवर तीन तासांचा सिनेमा करण्यापेक्षा मालिकेची निर्मिती करण्याचं श्वेताने ठरवले आणि लागीर झाला जी या मालिकेचा जन्म झाला. या मालिकेसाठी आपल्या साता-यातील कलाकारांना श्वेतानं संधी दिली. शिवाय साता-यातील भाषा मराठी रसिकांसमोर लागीर झालं जी मालिकेच्या निमित्ताने ती घेऊन आली. या मालिकेचं शूटिंगही साता-यातील वाई परिसरातच होतं. या सगळ्या गोष्टीमुळेच लागीर झालं जी ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. मराठी अभिनेत्री एक उत्तम निर्माती होऊ शकते हे श्वेतानं सिद्ध करुन दाखवलं आहे.

Also Read:अज्याला गुडलक देणारी, स्वतः अभ्यासात ‘ढ’ असणारी शीतली रिअलमध्ये तितकीच हुश्शार आणि फाडफाड बोलते ही परदेशी भाषा, जाणून घ्या!

Web Title: Shweta Shinde, who was a successful series producer, was born as the 'Lageer Jhaal ji' series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.