Shweta is excited to play this character | 'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक
'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक

ठळक मुद्देतिच्या व्यक्तिरेखेत बदल होणार असून आता ती नकारात्मक होणार आहे

सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत  श्वेता महाडिक  एक आज्ञाधारक सून दुर्गाची भूमिका साकारीत आहे. मात्र तिच्या व्यक्तिरेखेत बदल होणार असून आता ती नकारात्मक होणार आहे. यापूर्वी दुर्गाची व्यक्तिरेखा अतिशय शक्तिशाली, सत्यप्रेमी आणि आपली मूल्ये आणि आदर्शांवर ठाम राहणारी सून अशी होती. आता ती गुड्डनच्या (कनिका मान) विरोधात कारस्थाने करताना दिसेल. विशेष म्हणजे मालिकेचा नायक आणि गुड्डनचा पती अक्षत जिंदालही (निशांतसिंह मलकाणी) याकामी तिला मदत करताना दिसेल! दुर्गा आपल्या कट-कारस्थानांनी गुड्डनचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात यशस्वी होते आणि नंतर तिला जिंदाल हाऊसमधूनही बाहेर काढते.

या नकारात्मक भूमिकबद्दल श्वेता महाडिक म्हणाली, “कलाकाराला वैविध्यपूर्ण भूमिका साकारता आल्या पहिजेत, हे खरं. नकारात्मक भूमिकेला अनेक छटा असतात. आता मी बऱ्याच वर्षांनंतर एखादी नकारात्मक भूमिका रंगवीत असून त्यामुळेच मला या भूमिकेबद्दल उत्सुकता लागली आहे. मालिकेच्या सध्याच्या कथाभागात ही नाट्यपूर्ण भूमिका रंगविणं फारच बहारदार आह. पण कोणतीही भूमिका ही पूर्णवेळ तुमच्या मनात राहते आणि त्यामुळे नकारत्मक भूमिकेचा तुमच्या जीवनावर विपरित परिणाम होतो, असं मला वाटतं. या नकारात्मक ऊर्जेचं ओझं तुम्ही सतत मनावर घेऊन वावरत असता, त्यामुळेच त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ न देणं हे एक आव्हानच असतं. तरीही मी म्हणेन की सकारात्मक भूमिकेकडून नकारात्मक भूमिकेकडे होत असलेला प्रवास ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे, जी स्वीकारण्यासाठी मी उत्सुक बनले आहे.”

मालिकेच्या आगामी भागांमध्ये अंगद (अचल टंकवाल) दुर्गाचे खरे रूप उघड करताना दिसेल. पण कपटी दुर्गा सारा दोष सरस्वतीच्या (रश्मी गुप्ता) माथ्यावर फोडेल आणि स्वत: नामानिराळी राहील. दुर्गाचे हे नाट्यपूर्ण कारस्थान आहे तरी काय, त्याची प्रतीक्षा करा.

Web Title: Shweta is excited to play this character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.