'रंग माझा वेगळा' मालिकेतील श्वेता आहे या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:50 PM2021-04-15T12:50:20+5:302021-04-15T12:51:28+5:30

'रंग माझा वेगळा' या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरेने प्रेक्षकांच्या मनात छाप उमटवली आहे.

Shweta is the daughter of a famous person in the series 'Rang Mazha Vegla' | 'रंग माझा वेगळा' मालिकेतील श्वेता आहे या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी

'रंग माझा वेगळा' मालिकेतील श्वेता आहे या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात पोहचली. या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे. 


 अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. 'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.


अनघाचे नाशिक शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. 


भगरे गुरूजी सध्या झी मराठीवर 'वेध भविष्याचा' आणि नुकत्याच सुरू झालेल्या पौराणिक मालिकेत पहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात आहे.

पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. भगरे गुरूजी आपल्या शैलीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. 

Web Title: Shweta is the daughter of a famous person in the series 'Rang Mazha Vegla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.