झी युवा वाहिनीवरील 'साजणा' ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. महाराष्ट्रातील गावाकडील संस्कृती, तिथे फुलणारे प्रेम यावर ही मालिका प्रकाश टाकते. निखळ प्रेमाच्या विविध रंगछटा दाखवणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हे मुख्य भूमिकेत आहेत.

ही मालिका कमी वेळातच लोकप्रिय होण्यात संपूर्ण टीमचा महत्त्वाचा वाटा आहे. पूजाच्या चित्रीकरणादरम्यान सुद्धा असेच एक उदाहरण 'साजणा'च्या सेटवर पाहायला मिळाले.

लाजऱ्याबुजऱ्या रमाची भूमिका साकारणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र खंबीर आहे. आपल्यामुळे चित्रीकरणात अडथळा येऊ नये, या तिच्या विचारांमधून तिचे कामाच्या बाबतीत असलेले समर्पण पाहायला मिळाले. तिच्या चेहऱ्याला काही कारणाने अ‍ॅलर्जी आली होती. याचा तिला त्रास होत असतानाही, सलग ३ दिवस तिने चित्रीकरणात कुठेही व्यत्यय येऊ दिला नाही. अ‍ॅलर्जीमुळे होत असलेला त्रास तिने आपल्या चेहऱ्यावर कुठेही दिसू दिला नाही.

तिची कामाप्रती असलेली निष्ठा, कामाची आवड आणि समर्पण याचे हे उत्तम उदाहरण ठरले. पूजा बिरारीला अ‍ॅलर्जीमुळे त्रास होत असतानाही चित्रीकरण सुरळीत व अखंडितपणे पार पडले. मालिकेच्या लोकप्रियतेचे व यशाचे रहस्य हे अनेकदा अशा गोष्टींमध्ये दडलेले असते. अस्सल कलाकार, कलेसाठी  अडचणींना लीलया सामोरा हे पूजाने सर्वांना दाखवून दिले आहे.


Web Title: Shooting did not stop by pooja birari even when the allergies were on her face
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.