'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:36 PM2022-05-13T14:36:14+5:302022-05-13T14:38:12+5:30

. मालिकेत नुकताच आशुतोषचा मोठा अपघात झालेला पाहायला मिळाला. यामुळे अरुंधती कोलमडून गेली आहे.

Shocking turn in 'Aai kuthe kay karte', Ashutosh will go into coma | 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिका ( Aai kuthe kay karte ) सततच्या ट्वीस्टमुळे चर्चेत येत असते. मालिकेत नुकताच आशुतोषचा मोठा अपघात झालेला पाहायला मिळाला. यामुळे अरुंधती कोलमडून गेली आहे. आशुतोषवर उपचार सुरु असताना अरुंधतीच्या भावनांचा बांध फुटतो आणि तिला आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. नकळत का होईना पण अरुंधती आशुतोषवरील प्रेमाची कबुली अनिरुद्ध समोर देताना दिसली. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळाले की, यात यश अरुंधतीच्या घरी येतो. आई तू फोन का उचलत नाहीस कुठेय तुझा फोन मी  फोन करतोय तुला. यावर अरुंधती त्याला काय झालंय, कशासाठी फोन करत होतास असे घाबरेलल्या आवाजात विचारताना दिसतेय. यावर यश काहीच बोलत नाही म्हणून ती त्याला गदागदा हलवून यश तू बोलत का नाहीस काय झालंय. यावर यश फक्त आशुतोष, आशुतोष ऐवढंच बोलतोय. अरुंधती यशला आशुतोषला काय झालं असं सारखं विचारताना दिसतेय. यावर यश तिला काहीच सांगत नाहीय. दरम्यान आशुतोष कोमात गेल्याचं दिसतंय. हि गोष्ट अरुंधतीला सांगण्याची हिंमत यशला मात्र होतं नाही. 

डॉक्टरांनी आशुतोष कोमात जाऊ शकतो, अशी शक्यता आधीच वर्तवली होती. अरुंधती इतका मोठा धक्का कसा पचवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आशुतोष कोमात कधी बाहेर येणार आहे तो बरा झाल्यावर अरुंधती त्याच्यावरील प्रेमाची कबुली देणार का?,  याबद्दल देखील सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. 
 आता मालिकेत पुन्हा कोणते नवीन वळण येणार? आशुतोषचे काय होणार? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: Shocking turn in 'Aai kuthe kay karte', Ashutosh will go into coma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.