शिवांगी जोशीने 'ह्या' भूमिकेसाठी घेतला आपल्या काउंसिलर मैत्रिणीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 07:15 AM2019-04-14T07:15:00+5:302019-04-14T07:15:00+5:30

स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है!' या मालिकेत नायराच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहचली.

Shivangi Joshi took the advice of his councilor friend for this role | शिवांगी जोशीने 'ह्या' भूमिकेसाठी घेतला आपल्या काउंसिलर मैत्रिणीचा सल्ला

शिवांगी जोशीने 'ह्या' भूमिकेसाठी घेतला आपल्या काउंसिलर मैत्रिणीचा सल्ला

googlenewsNext

स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है!' या मालिकेत नायराच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहचली.  तिच्या अभिनयाबद्दल आजवर तिला अनेक पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. तरीही आपली ही काऊन्सिलरची भूमिका अजून परिपूर्ण करण्याच्या हेतूने तिने आपल्या काही काऊन्सिलर मैत्रिणींशी या व्यवसायाबद्दल चर्चा केली.

आताच्या कथानकात प्रेक्षकांना दिसत आहे की पुरुकाका हा नायराला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कसा प्रयत्न करीत आहे; पण अखेरीस नायरा त्याच्या तावडीतून सुटेल काय आणि ती पुरुकाकाचे खरे स्वरूप उघड करील काय?

 निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, 'शिवांगी ही केवळ नसून ती आपल्या भूमिकेची संपूर्ण तयारी करते. आता एक काऊन्सिलर म्हणून तिला या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी आपली देहबोली आणि अन्य बारकावे कसे असावेत, ज्यामुळे प्रेक्षकांना आपली व्यक्तिरेखा अस्सल व विश्वासार्ह वाटेल, याची तिने काळजी घेतली. 


कौटुंबिक लैंगिक छळणुकीच्या बळी ठरलेल्या काही महिलांना कशा प्रकारे सल्ला दिला जातो, ते पाहण्यासाठी तिने आपल्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून वेळ काढला आणि आपल्या एका काऊन्सिलर मैत्रिणीची भेट घेतली. या बळी महिलांची मानसिक अवस्था कशी असते, त्याला या महिला कशा प्रकारे सामोऱ्या जातात आणि त्यांना कोणता त्रास सहन करावा लागलेला असतो, याचं तिने एक दिवसभर निरीक्षण केले. आपली भूमिका ही अस्सल वाटली पाहिजे, याबाबत शिवांगी काटेकोर असल्याने तिने ही मेहनत घेतली.'


शिवांगीची ही मेहनत निश्चितच प्रशंसनीय आणि प्रेरणादायकही आहे. तिच्या या भूमिकेमुळे प्रेक्षक टीव्हीच्या पडद्याला खिळून राहतात. आता तिच्या या भूमिकेतील आविष्कार पाहणे ही प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल!

Web Title: Shivangi Joshi took the advice of his councilor friend for this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.