ठळक मुद्देपराग आणि रूपाली यांच्या जोडीची चर्चा असतानाच बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेमकथा सुरू झाली असल्याची चर्चा रंगली आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव आणि वीणा यांच्‍यातील मैत्री पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनला खूपच चांगला टिआरपी मिळाला होता. पहिल्या सिझनमधील स्पर्धकांमधील वाद तर चांगलेच गाजले होते. पण त्याहीपेक्षा या सिझनमधील राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. यामुळे हा कार्यक्रम चांगलाच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला  होता.

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच आताच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना या कार्यक्रमात एक प्रेमकथा फुलताना दिसली होती. पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांच्यातील संवाद पाहाता डाल में कुछ काला है असे आता लोकांना वाटायला लागले होते. 

पराग आणि रूपाली यांच्या जोडीची चर्चा असतानाच बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेमकथा सुरू झाली असल्याची चर्चा रंगली आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्‍यातील मैत्री पाहायला मिळत आहे. ते दोघे 'वीकेण्‍डचा डाव' साठी तयारी करत असताना शिव वीणाला त्‍याचा मेक-अप करण्‍यासाठी मदत मागत आहे तर ती त्‍याला चिडवत म्‍हणत आहे की, ''असा डार्क मेकअप करते ना तुझा...'' याबाबत शिव निराश होऊन म्हणतो, ''कसे लोक आहेत या जगात हेच समजत नाही मला. भलाई का तो जमाना ही नहीं है आजकल.'' त्यानंतर कोणता सूट घालू हे देखील शिव तिला विचारत आहे. पण त्यावर वीणा म्हणते, '' तू आता घातलेला सूटच छान असून हाच घाल, हाच जास्‍त छान वाटतोय.'' फक्‍त एवढेच नाही, शिव वीणाला चिडवत म्‍हणतो, '' तू भाव खा फक्‍त, राधा झाली आहे ना?'' यावर वीणा प्रत्‍युत्‍तर देते आणि म्हणते, ''राधा तर मी आहेच!'' पुढे ती शिवला म्‍हणते, ''तुला गरज काय मेकअपची, चांगला तर दिसतोस.'' 


Web Title: shiv thakare and veena Jagtap are New couple in Bigg Boss Marathi 2?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.