Shiv and veena did a romantic dance in bigg boss house | 'बिग बॉस मराठी 2': घरात शिव पडला कोणाच्या प्रेमात ?
'बिग बॉस मराठी 2': घरात शिव पडला कोणाच्या प्रेमात ?

ठळक मुद्देघरात आज रंगणार प्रेमशास्त्राचा तास

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजही शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक हे कार्य रंगणार आहे. काल या टास्क मधून शिक्षकांनी शिवानी सुर्वे, विद्याधर जोशी यांना नापास केले. तर विणाने तिच्या विदयार्थीबरोबर सेल्फी काढला. आज देखील हा टास्क रंगणार असून पराग कान्हेरे घेत असलेल्या प्रेमशास्त्र या तासाला सगळ्यांनाच आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. या तासात सगळ्याच सदस्यांनी बाजी मारली आहे. आज या तासाला विणा आणि शिव यांचा 'आंखों की गुस्ताखियां' या गाण्यावर सुंदर डान्स बघायला मिळणार आहे. तर शिवानी माधवला सांगताना दिसणार आहे, माझ्या फोटोवर कोणी नापास लिहायचे नाही, मी कायम पास होते आणि तिने तिच्या फोटोवर नापास लिहिलेले पुसून टाकले.

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वे बिग बॉसना सांगताना दिसली कि, मला या घरामध्ये रहायचे नाही, मी या घरामध्ये नाही राहू शकत, मला खूप त्रास होतो आहे.शिवानी सुर्वेला इस्पितळात देखील नेण्यात आले, जिथे तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही.

बिग बॉसच्या टीमने संपूर्ण काळजी घेऊन देखील शिवानीने घरामध्ये कायद्याची गोष्ट करणे बिग बॉसला चुकीचे वाटले आणि म्हणूनच बिग बॉसने तिला सांगितले आता हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत येईल, त्यावर शिवानीने तिची बाजू मांडली आणि ती भावूक झाली. आज काय घडेल ? बिग बॉस कोणता निर्णय घेतील ?हे बघणे रंजक असणार आहे.


Web Title: Shiv and veena did a romantic dance in bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.