Shiv and aroh will give dance performance in bigg boss marathi house | Bigg Boss Marathi 2 : घरात आज हे दोन सदस्य करणार धम्माकेदार डान्स, वाचा सविस्तर!
Bigg Boss Marathi 2 : घरात आज हे दोन सदस्य करणार धम्माकेदार डान्स, वाचा सविस्तर!

बिग बॉस मराठीच्या घरात आज जंगी सेलिब्रेशन होणार आहे. सदस्य धम्माल, मस्तीच्या मूड आहेत. फूल पार्टी मूड असणार आहे, कारणदेखील तसेच आहे… बिग बॉस यांनी आज सदस्यांवर BB बर्थडे पार्टी हे कार्य सोपावले आहे... त्यामुळे सदस्य एकदम मस्तीच्या मूडमध्ये आहेत असे म्हणायला हरकत नाही. आरोह आज सैराट चित्रपटाच्या गाण्यावर झिंगाट डान्स करताना दिसणार आहे.

झिंगाट गाण्यावर सगळेच सदस्य दिलखुलास पणे डान्स करताना दिसणार आहेत... तर शिवने देखील मल्हारी या गाण्यावर डान्स सादर केला आहे.आरोह आणि शिवच्या या धम्माकेदार डान्सने घरामधील पार्टीला अजूनच रंगत येणार आहे हे निश्चित.

या कार्यामध्ये बिचुकलेंचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. बिचुकले आज “आया है राजा” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. वीणा, शिवानी, नेहा, किशोरी हे कोणत्या गाण्यावर नृत्य सादर करतील हे आज नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 


Web Title: Shiv and aroh will give dance performance in bigg boss marathi house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.