​शिल्पा शिरोडकर आणि स्वरदा ठिगळे झळकणार सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 12:01 PM2017-03-22T12:01:59+5:302017-03-22T17:33:05+5:30

शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर ...

Shilpa Shirodkar and Swarada Thigale will be seen in the series of Savitri Devi College and Hospital. | ​शिल्पा शिरोडकर आणि स्वरदा ठिगळे झळकणार सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेत

​शिल्पा शिरोडकर आणि स्वरदा ठिगळे झळकणार सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेत

googlenewsNext
ल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर होती.  पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. आता ती सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेत काम करणार असून नायिकेच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल ही मालिका साची या मेडिकल क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या मुलीची कथा आहे. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलगी एका रुग्णालयात इन्टर्न म्हणून काम करायला लागते. या साचीचा प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत साची ही भूमिका स्वरदा ठिगळे साकारत आहे. स्वरदाने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेद्वारे ती हिंदी मालिकेकडे वळत आहे. याविषयी ती सांगतेय, "मराठी मालिका आणि चित्रपटात काम केल्यानंतर आता मी हिंदी मालिकेकडे वळत आहे. सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या मालिकेची कथा मला आवडल्याने ही मालिका स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला. या मालिकेतील साची ही भूमिका अतिशय सशक्त असून हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. मी आतापर्यंत अनेक हिंदी मालिका पाहिल्या आहेत. आज मी हिंदी मालिकांचा भाग होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे." 

shilpa shirodkar


 

Web Title: Shilpa Shirodkar and Swarada Thigale will be seen in the series of Savitri Devi College and Hospital.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.