ठळक मुद्दे‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका सोडल्यानंतर शिल्पा चर्चेत आली होती. मालिकेचे मेकर्स खूप काम करून घेतात पण मानधन देत नाहीत, असा आरोप शिल्पाने केला होता.

सिंगर मीका सिंगने पाकिस्तानमध्ये परफॉर्म केला आणि भारतात त्याच्यावर बंदी लादली गेली. काभारत-पाकमधील तणावपूर्ण वातावरणात मीका पाकिस्तानाता जाऊन गातोच कसा? असा सवाल करत सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. यानंतर  ऑल इंडिया सिने वर्कर एसोसिएशन  आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉई  यांनी त्याच्यावर बंदी घातली. पुढे मीकाने संपूर्ण देशाची माफी मागितली आणि तेव्हा कुठे ही बंदी उठली. आता प्रकरण निवळले असे वाटत असतानाच अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे समोर आली. तिने या प्रकरणावर अशी काही प्रतिक्रिया दिली की, सर्वत्र खळबळ माजली. 


होय, मी पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, कोण अडवतो बघूच, असे खुले आव्हान तिने दिले.  स्पॉट बॉयने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा अगदी उघडपणे मीका सिंगच्या समर्थनार्थ मैदानात उतरली. ‘माझा देश मला व्हिसा देत असेल आणि त्यांचा देश माझे स्वागत करत असेल तर मी पाकिस्तानात नक्कीच जाईन. एक कलाकार म्हणून त्या ठिकाणी परफॉर्म करणे हा माझा हक्क आहे. माझा हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याही कलाकारावर अशाप्रकारे बंदी नाही घालू शकत. उद्या मी रस्त्यावरही स्टेज लावून परफॉर्म करु शकते. मीका सिंहला जबरदस्तीने माफी मागायला लावणे आहे, हे अत्यंत  चुकीचे आहे,’ असे शिल्पा म्हणाली. ती इथेच थांबली नाही तर, संधी मिळाल्यास मी प्रत्येकठिकाणी परफॉर्म करेल. हिंमत असेल तर मला रोखून दाखवावे. मीका सिंगवर बंदी घालणाºया फेडरेशन अशा अनेक आहेत. त्यांना केवळ पैसे हवेत. मला अशांची अजिबात भीती वाटत नाही, असेही शिल्पा म्हणाली.


मी पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा विचार करतेय. हिंमत असेल तर मला थांबवून दाखवावे. आपण स्वत:ला स्वतंत्र म्हणतो, हेच स्वातंत्र्य आहे का? असा सवालही तिने केले. कधीकाळी माझ्यावरही बंदी घातली गेली. पण मी माफी मागितली नाही. आज मी कुठल्याही संघटनेची सदस्य नाही. मात्र हणून मी काम करणे बंद केलेले नाही. माझ्यावर बंदी घालून माझे करिअर संपवले, असे कुणाला वाटत असेल तर असे काहीही झालेले नाही, असेही ती म्हणाली.


‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका सोडल्यानंतर शिल्पा चर्चेत आली होती. मालिकेचे मेकर्स खूप काम करून घेतात पण मानधन देत नाहीत, असा आरोप शिल्पाने केला होता. हे प्रकरण प्रचंड गाजले होते.

Web Title: shilpa shinde open challenge on mika singh ban says i will perform in pakistan who will stop me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.