सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे ‘सांग तू आहेस का’मालिकेत झळकत आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते.   सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. मात्र सोशल मीडियावरील शिवानीचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे. 


या फोटोंमध्ये शिवानीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या शिवानीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. तिचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.शिवानीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली.  शिवानीचा लूक तर लय भारी मात्र ती लग्न करणार की काय अशा शक्यतेने रसिकांचा विशेषतः तरुणांचा हिरमोड झाला आहे. 


सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत.सोशल मीडियावरील शिवानीचे नववधू रुपातील फोटो पाहून तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील

 

फोटोंमध्ये तिचा घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतोय. हॉट, गॉर्जिअस, कूल, स्टनिंग अशा कमेंटस आल्या आहेत.‘बनमस्का’ मालिकेमुळं शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं.

कथा उत्तम असेल, तर भूमिका साकारताना मजा येते. त्यामुळे सगळेच जॉनर उत्तम असतात. आतापर्यंत थ्रिलर किंवा कॉमेडी जॉनरमध्ये काम केलं नाही. त्यामुळे अशी भन्नाट भूमिका साकारायची खूप इच्छा आहे, असं शिवानीने सांगितले होते.

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiavani Rangole Bridal Look Photo On Social Media, Creating Buzz Of Her Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.