छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका शाका लाका बुम बुममध्ये संजूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला आहे आणि तो मालिकेत मुख्य भूमिकेत पहायला मिळतोय. सध्या तो जात ना पुछो प्रेम की या मालिकेत काम करतो आहे. त्याची गर्लफ्रेंडदेखील टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येच काम करते आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना.

किंशुक वैद्यच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे शिव्या पठानिया. शिव्या सध्या कलर्स वाहिनीवरील राम सिया के लव कुश' या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत ती सीताची भूमिका साकारते आहे.

किंशुक व शिव्या त्यांच्या नात्याबद्दल दिलाखुलासपणे बोलतात. इतकेच नाही तर ते बऱ्याचदा एकत्र पहायला मिळतात.

 

सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो पहायला मिळतात. 


शिव्याने २०१४ साली हमसफर्स मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. एक रिश्ता साझेदारी का या मालिकेत शिव्या व किंशुक एकत्र काम करताना दिसले होते. या मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. 


नुकत्याच एका मुलाखतीत शिव्याला तिच्या आयुष्यातील रामाबद्दल म्हणजेच किंशुकबद्दल विचारलं असता ती म्हणाली की,  खऱ्या आयुष्यात माझा राम आहे. सध्या तो एका मालिकेत बिझी आहे.

सध्या आम्ही कामावर लक्ष देतो आहे. कारण आमचं अजून वय आहे की आम्ही कामावर लक्ष केंद्रीत करू शकतो. अशा कथा जगू व आणखीन चांगल्या भूमिका करू शकू. एक वेळ येईल जेव्हा आम्ही देखील लोकांसमोर अशा कथा सादर करू शकू.

Web Title: Shaka Laka Boom Boom Fame Kinshuk Vaidya's girlfriend Shivya Pathaniya is so pretty, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.