Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: शैलेश लोढांचा पत्ता कट, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाला नवा ‘तारक मेहता’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 01:54 PM2022-09-12T13:54:57+5:302022-09-12T13:56:10+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तुम्हीही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला अखेर नवा तारक मेहता मिळाला आहे. 

Shailesh Lodha's address cut, 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma' got a new 'Taarak Mehta' | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: शैलेश लोढांचा पत्ता कट, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाला नवा ‘तारक मेहता’

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: शैलेश लोढांचा पत्ता कट, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाला नवा ‘तारक मेहता’

googlenewsNext

तुम्हीही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला अखेर नवा तारक मेहता मिळाला आहे.  या मालिकेतून शैलेश लोढा (Sailesh Lodha) यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी एक नवा चेहरा तारक मेहता बनून मालिकेत एन्ट्री घेणार आहे. 

शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेलं तारक मेहता हे पात्र तुफान गाजलं होतं. पण त्यांनी अचानक मालिका सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शोमधून हे पात्र गायब होतं. प्रेक्षकांना तारक मेहताची कमतरता जाणवत असल्याने ते निराश होते. पण आता शोमध्ये तारक मेहता येणार आहेत.  या भूमिकेसाठी अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) याचं नाव फायनल झालं आहे. सचिन श्रॉफने मालिकेचं शूटींगही सुरू केलं आहे. खुद्द ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील शैलेश लोढा यांनी साकारलेल्या तारक मेहता या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु, मालिकेबरोबर केलेल्या करारामुळे ते नाखुश होते. त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे 14 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आम्हाला कुणाला तर घ्यायचंच होतं...
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांनी सचिन श्रॉफचं नाव कन्फर्म केलं. शैलैशला परत आणण्याचे आम्ही बरेच प्रयत्न केले. पण त्याने शो सोडला. तो गेला, पण मालिका थांबणार नव्हती. आम्हाला नवा तारक मेहता हवाच होता. कारण मला प्रेक्षकांना निराश करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही नव्या चेहऱ्याचा शोध घेतला आणि अखेर सचिन श्रॉफचं नाव फायनल झालं. त्याने शूटींगही सुरू केली आहे, असं असित मोदी म्हणाले.

 

सचिन श्रॉफ हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. ओटीटीवरच्या ‘आश्रम 3’ या वेबसीरिजमध्येही तुम्ही त्याला पाहिलं असेलच. या सीरिजमध्ये त्याने हुकूमसिंग या राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे.  स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ मालिकेत दिसला होता.  
 

Web Title: Shailesh Lodha's address cut, 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma' got a new 'Taarak Mehta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.