SEE PICS:'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेने पूर्ण केले 400 एपिसोड्स,सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 07:48 AM2017-11-30T07:48:40+5:302017-11-30T13:19:05+5:30

गुरुनाथ, राधिका आणि शनाया यांच्यावर आधारित 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच गाजते आहे. नवनवीन ट्विस्ट ...

SEE PICS: 'My Wife's Wife' completes 400 episodes, estimated to be the artist at the time of celebration | SEE PICS:'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेने पूर्ण केले 400 एपिसोड्स,सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाज

SEE PICS:'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेने पूर्ण केले 400 एपिसोड्स,सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाज

googlenewsNext
रुनाथ, राधिका आणि शनाया यांच्यावर आधारित 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच गाजते आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे. घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे. नुकतंच या मालिकेला छोट्या पडद्यावर दाखल होऊन एक वर्ष पूर्ण झालं.या निमित्ताने या मालिकेच्या टीमने जोरदार मालिकेचे वर्षपूर्ती सेलिब्रेशन केले होते.आता पुन्हा या मालिकेच्या सेटवर मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आले. त्याला खास निमित्तही होतं. ते म्हणजे या मालिकेने त्यांचे 400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.त्यामुळेच पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर कलाकारांनी केक कटींग करता सेलिब्रेशन केले. यावेळी मालिकेतील प्रत्येक सदस्य उपस्थित होती. विशेष म्हणजे शनाय,गुरूनाथ आणि राधिका प्रत्येक कलाकार मस्तीच्या मुडमध्ये दिसला. केक कटींग केल्यानंतर प्रत्येकजण शनाया आणि राधिका यांच्या चेह-यावर केक लावण्याचा आनंद लुटतान दिसले. ऑनस्क्रीन शनाया आणि राधिका यांचा छत्तीसचा आकडा असला तरी ऑफस्क्रीन या दोघांची खुप चांगली मैत्री आहे.विशेष म्हणजे या खास सेलिब्रेशनला  केकही खास होता. राधिका,गुरूनाथ आणि शनाया यांचे मालिकेचे  पोस्टर लकू असलेला केक बनवण्यात आला होता.घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात एन्जॉय केली आहे त्यामुळे 400 एपिसोड्सचा टप्पा पार केलेल्या या मालिकेचे 1000 एपिसोडस होवोत अशाच सा-यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.(Also Read:पुरुषी वृत्तीवर संतापणारी ‘माझ्या नव-याची बायको’मधील ‘रेवती’चा हा अंदाज तुम्ही कधी पाहिला आहे का?)



छोट्या पडद्यावर माझ्या नव-याची बायको ही मालिकने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.सध्या तुझ्यात जीव रंगला मालिकेला  या मालिकेला 'माझ्या नव-याची बायको' मालिकेकडून  जोरदार टक्कर पाहाला  मिळत आहे.'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले आहे. माझ्या नवऱ्याची बायको टीआरीपमध्ये अव्वल स्थानी आहे. तर 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. तिसरे स्थान 'लागिरं झालं जी' या मालिकेनं मिळवले. चला हवा येऊ द्या चौथ्या स्थानी असल्याचे पाहायला मिळाले होते.     

Web Title: SEE PICS: 'My Wife's Wife' completes 400 episodes, estimated to be the artist at the time of celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.