'School life is the happiest day', Snehalta Vasaikar reminisces about school life | 'शालेय जीवन सर्वात सुखी दिवस',स्नेहलता वसईकरने दिल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

'शालेय जीवन सर्वात सुखी दिवस',स्नेहलता वसईकरने दिल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे, ज्यांनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या मदतीने समाजातील रुढींचा विरोध करून जनतेच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. या मालिकेत सध्या सुरू असलेला शिक्षणाचा भाग करताना या मालिकेत अहिल्येच्या सासूची म्हणजे गौतमाबाईची भूमिका करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर भावनिक होऊन थेट शालेय दिवसांत पोहोचली. तिने आपल्या शाळेतल्या दिवसांची आठवण काढली, जेव्हा जीवन खूप सोपे आणि साधे होते.
 
 याबद्दल स्नेहलता वसईकर म्हणाली, “मला वाटते की शाळेतले दिवस हे आपल्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस असतात. त्या काळात आपण घडत असतो. शाळाच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते, आपली मानसिकता घडवते, आणि जीवनविषयक मूल्ये आपल्यात रुजवते. मालिकेत सध्या सुरू असलेला शिक्षणाचा भाग करताना शालेय जीवनातील असंख्य आठवणींनी माझं मन भरून गेलं आहे. म्हणतात ना, ‘वेळ एका दिशेने प्रवास करतो, आठवणी दुसर्‍या दिशेने!”

मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या आईवडिलांना हे जाणवले होते की, शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळेच त्यांनी मला अभ्यासात वर येण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. मला माझ्या मुलीसाठी देखील तसेच व्हायला हवे आहे. मला वाटते की शिक्षण तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवते आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवते.”


 
या मालिकेत दाखवले आहे की, अगदी लहापणापासूनच अहिल्या एक जगावेगळी मुलगी होती. तिच्यात स्वप्न बघण्याची धमक होती आणि समाजातील अन्यायकारक परंपरांचा तिने विरोध केला. सध्याच्या कथानकात आपल्याला बघायला मिळेल की, आपल्या आईवडिलांचा विरोध असतानाही शिक्षण घेण्यास उत्सुक अहिल्येला औपचारिक शिक्षण घेण्याची इच्छा असते. अहिल्येला वाटते की तिला तिचे पती खंडेरावाच्या बरोबरीची वागणूक मिळायला हवी. पुण्यश्लोक अहिल्याबाई दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'School life is the happiest day', Snehalta Vasaikar reminisces about school life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.