लगीनघाई सुरू..! सायली संजीव अडकणार लग्नबेडीत?, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:10 PM2021-06-17T12:10:38+5:302021-06-17T12:11:25+5:30

अभिनेत्री सायली संजीवच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

Sayali Sanjeev Mehandi ceremony photo goes viral | लगीनघाई सुरू..! सायली संजीव अडकणार लग्नबेडीत?, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

लगीनघाई सुरू..! सायली संजीव अडकणार लग्नबेडीत?, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असून सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र ही लगीनघाई सायलीची नसून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका शुभमंगल ऑनलाईनमधील शर्वरीची आहे. लवकरच शर्वरी आणि शंतनू लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत.

ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू - शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण पहायला मिळत आहे.

अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खूप आनंदी आहेत. घरच्या घरी मेंदीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाही. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे. जगदीशने माधुरीला सक्त ताकीद दिली आहे. सगळे काही नीट सुरळीत सुरू असताना आता मिठाचा खडा टाकलास तर मी तूला घटस्फोट देईन. मात्र माधुरी यामधील कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही.


शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे, लग्नाच्या पवित्र बंधनात शंतनू – शर्वरी जोडले जाणार आहेत. मेहंदी विशेष भाग आज रात्री १०.०० वा. शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये पहायला विसरू नका.

Web Title: Sayali Sanjeev Mehandi ceremony photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.