सीनिअर्स निर्णय घेणारे कोण? सारा गुरपाल घराबाहेर होताच भडकले ‘बिग बॉस 14’चे फॅन्स 

By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 11:24 AM2020-10-13T11:24:32+5:302020-10-13T11:27:16+5:30

‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने पहिल्या एविक्शनची हिंट दिली होती. त्यानुसार, पंजाबी सिंगर सारा गुरपाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

sara gurpal evicted from bigg boss 14 fans call seniors biased | सीनिअर्स निर्णय घेणारे कोण? सारा गुरपाल घराबाहेर होताच भडकले ‘बिग बॉस 14’चे फॅन्स 

सीनिअर्स निर्णय घेणारे कोण? सारा गुरपाल घराबाहेर होताच भडकले ‘बिग बॉस 14’चे फॅन्स 

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात आलेले हिना, गौहर व सिद्धार्थ हे धाकड सीनिअर्स आणखी एक आठवडा घरवाल्यांसोबत राहणार आहेत.

‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने पहिल्या एविक्शनची हिंट दिली होती. त्यानुसार, पंजाबी सिंगर सारा गुरपाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. पहिल्याच आठवड्यात ती बिग बॉसमधून आऊट झाली. बिग बॉसच्या घरात असलेले सीनिअर्स अर्थात सिद्धार्थ शुक्ला, हिना खान व गौहर खान या तिघांनी मिळून साराला अ‍ॅलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला. साराने हा निर्णय खिलाडूवृत्तीने मान्य केला. पण बिग बॉसच्या चाहत्यांना मात्र सीनिअर्सचा हा निर्णय पचला नाही. सीनिअर्स पक्षपाती असल्याचा आरोप करत अनेक चाहत्यांनी यानंतर सोशल मीडियावर केला.

साराच्या सपोर्टमध्ये चाहत्यांनी अनेक ट्व‍ीट केलेत. चाहत्यांच्या मते, सीनिअर्सनी पक्षपाती निर्णय घेत साराला घराबाहेर काढले. निशांत मलकानी व राहुल वैद्य यांच्या तुलनेत सारा बिग बॉसच्या घरात अधिक अ‍ॅक्टिव्ह होती.

सिद्धार्थला सारा बाहेर काढायचे होते आणि हिना व गौहरने त्याच्या या निर्णयाला समर्थन दिले, असा आरोपही चाहत्यांनी केला. बिग बॉस स्क्रिप्टेड शो आहे, अशा शब्दांतही चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सारावर अन्याय झाला. ती सीनिअर्सच्या पक्षपाती निर्णयाची बळी ठरली, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात.

सारा ही एक पंजाबी मॉडेल, सिंगर व अभिनेत्री आहे. ती एक डान्सरही आहे.
2012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. 2017 मध्ये डेंजर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.
सारा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.

‘Bigg Boss 14’साठी सारा गुरपालने लपवले लग्न? जाणून घ्या काय आहे भानगड

PHOTOS: 'बिग बॉस 14'मध्ये सहभागी होताच वादात सापडलेल्या सारा गुरपालचे हे ग्लॅमरस फोटो पाहा!

आणखी एक आठवडा बिग बॉसच्या घरात राहणार सीनिअर्स
बिग बॉसच्या घरात आलेले हिना, गौहर व सिद्धार्थ हे धाकड सीनिअर्स आणखी एक आठवडा घरवाल्यांसोबत राहणार आहेत. म्हणजे आणखी एक आठवडा बिग बॉसच्या घरात राडा पाहायला मिळणार आहे. लवकरच घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीही होणार आहे.

Web Title: sara gurpal evicted from bigg boss 14 fans call seniors biased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.