संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:03 AM2019-09-13T10:03:26+5:302019-09-13T10:05:57+5:30

संजय दत्तने आजवर 'वास्तव- द रिअ‍ॅलिटी', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Sanjay Dutt makes his TV debut and we have prepared a small story on the same | संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण!

संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण!

googlenewsNext

बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच अभिनेता संजय दत्तने आपल्या हरहुन्नरी अभिनयकौशल्याने आजपर्यंत सा-यांची वाहवा मिळवली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीमुळे असंख्य चाहत्यांचा लाडका अभिनेता बनलेला संजय दत्त आता लवकरच छोट्या पडद्यावरही झळकणार आहे.

 

 

 

‘जग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी की’ या नव्या पौराणिक मालिकेचे निवेदन संजय दत्त करणार आहे. आपले चाहते आणि प्रेक्षकांनाही आपल्या आवाजातील निवेदन ऐकण्यात आनंद वाटेल, असे त्याला वाटेल असे संजय दत्तला वाटते.


या मालिकेची कथा वैष्णोदेवीच्या जन्माबद्दल असून भगवान शंकरांकडून पृथ्वीचे रक्षण करताना ती नष्ट होण्याचा धोका उत्पन्न झाल्यामुळे माता वैष्णोदेवीचा जन्म कसा झाला, हे यात सादर करण्यात आले आहे. संजय दत्तने आजवर 'वास्तव- द रिअ‍ॅलिटी', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अलीकडच्या काळात अग्निपथसारख्या चित्रपटात खलनायकाचीही भूमिका रंगवून सर्वांना चकित केले होते. त्याचवेळी त्याने आपल्या जीवनावरील 'संजू' या चित्रपटात एका गाण्यात छोटे दर्शनही दिले होते. आता त्याचे चाहते त्याला या मालिकेचा निवेदक म्हणून कसा स्वीकारतात हे पाहणे रंजक असणार आहे.


संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा 'प्रस्थानम' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टाने केले आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sanjay Dutt makes his TV debut and we have prepared a small story on the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.