करियरच्या बाबतीतील ही गोष्ट अजिबातच सहन करू शकत नाही संगीता घोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 06:00 PM2019-05-12T18:00:00+5:302019-05-12T18:00:00+5:30

अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनीची भूमिका साकारताना दिसत आहे.

 Sangeeta Ghosh can not tolerate this thing in terms of career | करियरच्या बाबतीतील ही गोष्ट अजिबातच सहन करू शकत नाही संगीता घोष

करियरच्या बाबतीतील ही गोष्ट अजिबातच सहन करू शकत नाही संगीता घोष

googlenewsNext

आपल्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत बहुतांशी सर्व यशस्वी मालिकांमध्ये भूमिका साकारलेली ज्येष्ठ अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि प्रेम मिळत असल्यामुळे ती खूप खूश आहे. तिने आजवर साकारलेल्या बहुतेक भूमिका लोकप्रिय ठरल्या असून त्यांची पुनर्निर्मिती केली जाऊ नये, असे तिचे मत आहे.

याबाबत संगीता घोष म्हणाली, “मला आजवर अनेक शक्तिशाली आणि संस्मरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या भूमिका इतक्या की माझे चाहते आणि प्रेक्षक मला माझ्या विविध भूमिकांच्या नावानेच अधिक ओळखतात. हा माझा सन्मानच आहे, असे मला वाटते. माझ्या आजवरच्या सर्व भूमिकांवर माझ्या चाहत्यांनी जो
प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्याबद्दल मी त्यांची ऋणी राहीन.”


गाजलेल्या मालिकांची नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा निर्मिती करण्याची प्रथा सध्या रूढ झाली आहे, त्यावर तिचे मत काय आहे, असे विचारता संगीता तात्काळ म्हणाली, “मी आजवर ज्या ज्या भूमिका रंगविल्या मग ‘देस में निकला होगा चाँद’मधील पम्मी असो की ‘दिव्य दृष्टी’मधली पिशाचिनी असो मी या सर्व भूमिकांमध्ये मनाने गुंतले आहे. या सर्व भूमिका एक मानदंडच ठरल्या आहेत. या अशा मालिका एकदाच लिहिल्या जातात आणि त्यांची निर्मितीही एकदाच होते, हे माझे मत काहींना पूर्वग्रहदूषित वाटेलही.

माझ्याही मालिकांची नव्याने निर्मिती करण्यात आली, तर त्यातील व्यक्तिरेखांची नावे तीच असतील, पण त्या भूमिका वेगळ्या असतील. या सर्व भूमिकांशी माझे भावनिक नाते जुळले आहे, त्यामुळे या भूमिका मी दुसऱ्या कलाकारांच्या रूपात पाहू शकत नाही.

Web Title:  Sangeeta Ghosh can not tolerate this thing in terms of career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.